Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

पटोले म्हणतात, ‘टीका करायची, तर खुर्ची सोडा!’

पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका करणे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना शोभत नाही. टीका करायची तर खुर्ची सोडा, मग आम्ही बघू, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यपालांना लगावला आहे. राज्यपालांनी भाजपचा कार्यकर्ता बनावे, मग त्यांनी स्वातंत्र्य आहे का, यावर बोलावे, असे ते म्हणाले.

राज्यपालांना टीका करण्याचा अधिकार नाही

एका कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावर टीका केली होती. नेहरूंच्या धोरणामुळे देश कुमकुवत झाल्याची टीका राज्यपालांनी केली होती.

त्यावर पटोले यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. राज्यपालांच्या खुर्चीवर बसून अशा प्रकारची टीका करण्याचे अधिकार नाहीत. ते भगतसिंह कोश्यारी म्हणून बोलत असतील.

Advertisement

तो त्यांचा अधिकार आहे. मग, त्यांना ती खुर्ची सोडावी लागेल. मग आम्ही त्यांना उत्तर काय द्यायचे ते निश्चित देऊ, असा हल्लाबोल पटोले यांनी केला.

केंद्र सरकारवर जोरदार टीका

पुण्यात पटोले यांच्या हस्ते पूरग्रस्तांना आज मदत पाठवण्यात आली. सारसबाग चौकामध्ये अण्णा भाऊ साठे यांना अभिवादनही केले. या वेळी माध्यमांशी संवाद साधत होते. त्या वेळी त्यांनी पटोले यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.

जासुसी केंद्राकडून

कोल्हापूर पूर पाहणीदरम्यान विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट झाली होती. या भेटीबाबत काँग्रेसच्या मनात कुठलीही शंका नाही. काँग्रेस सरकार जासुसी करत नाही ते काम केंद्राचा आहे, केंद्र ते करते आहे, असं ते म्हणाले.

Advertisement

मातंग समाजाच्या मागण्यांचा पाठपुरावा करणार

पृथ्वीराज चव्हाण जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. तेव्हा मेट्रोचा पाया रोवला गेला. भाजपने सात वर्षे देश मागे नेला आहे. त्याला श्रेय घ्यायचा असेल, तर त्यांना लखलाभ असं म्हणत त्यांनी भाजप सरकारवर टीका केली.

त्याचबरोबर मातंग समाजाच्या विविध मागण्यांचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवला आहे आणि त्याचा पाठपुरावा मी करणार आहोत, असंही पटोले यांनी सांगितलं.

 

Advertisement
Leave a comment