काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नियमबाह्य निविदांबाबत लिहिलेले पत्र आपल्याच पक्षाच्या मंत्र्याविरुद्ध असल्याची टीका व्हायला लागल्यानंतर ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी पटोले यांच्या पत्राचा ऊर्जा विभागाशी काहीही संबंध नाही, असा खुलासा केला.

निविदांत अनियमितता

पटोले यांनी नागपूर खनिकर्म महामंडळ व महाजनको यांच्या दरम्यान कोळसा पुरवठा आणि स्वच्छ करण्यासाठी काढलेल्या निविदा प्रक्रियेत अनियमितता झाल्याची तक्रार केली होती.

या तक्रारीनंतर नागपूरच्या विभागीय आयुक्तांची एकसदस्यीय समिती गठित करण्यात आली आहे. पटोले यांनी खनिजकर्म महामंडळाकडून महाजनकोला कोळसा पुरवणाऱ्या कंत्राटावर आक्षेप घेतला आहे. त्यामुळे त्यांच्या या पत्राचा ऊर्जा विभागाशी काहीही संबंध नाही, असे राऊत यांनी म्हटले आहे.

Advertisement

नेमकं प्रकरण काय ?

पटोले यांनी नागपूर खनिकर्म महामंडळ व महाजनको यांच्या दरम्यान कोळसा पुरवठा व स्वच्छ करण्यासाठी काढलेल्या निविदा प्रक्रियेत अनियमितता झाल्याची तक्रार केली होती.

खनिकर्म महामंडळातील निविदा प्रक्रियेची चौकशी करण्यासाठी नागपूरच्या विभागीय आयुक्तांची एकसदस्यिय समिती गठित करण्यात आली. या समितीला एक महिन्याच्या आत चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिले आहेत.

महजनको आणि नागपूर खनिकर्म महामंडळ यांच्यात ही निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. प्रक्रियेशी राज्य शासनाचा थेट संबंध नसल्याचे देसाई यांनी स्पष्ट केले.

Advertisement