किरकोळ कारणावरून टोळक्यानं दोघांवर तलवार, काठ्यांनी हल्ला करून, नंतर डोक्यात दगड घालून त्यांचा खून केला. त्यानंतर टोळके वेगवेगळ्या वाहनांतून पसार झाले. पाटस या ठिकाणी ही घटना घडली. याप्रकरणी 7 ते 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी त्यांना मारतच राहिले !

पूर्ववैमनस्यातून या दोघांची हत्या झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी काही आरोपींची ओळख पटवली असून त्यांचा शोध घेतला जात आहे.

शिवम संतोष शितकल (वय -23) आणि गणेश रमेश माकर (वय- 23) असं हत्या झालेल्या दोघा तरुणांची नावं आहेत.

Advertisement

दोन्ही तरुण रविवारी रात्री दहाच्या सुमारास पाटस हद्दीतील तामखडा येथील भानोबा मंदिर परिसरात आरोपींकडे गेले होते.

दरम्यान त्याठिकाणी असलेल्या सात ते आठ जणांच्या टोळक्यानं त्यांच्यावर काठी आणि तलवारीनं हल्ला चढवला.

मृत तरुणांना काही कळायच्या आत हा हल्ला झाल्यानं त्यांना घटनास्थळावरून पळही काढता आला नाही. यातच दोघंही खाली पडले. आरोपी तरुण त्यांना मारतच राहिले.

Advertisement

काय घडलं ?

मुख्य आरोपी मन्या उर्फ महेश संजय भागवत यानं एक मोठा दगड उचलून शिवम संतोष शितकल या तरुणाच्या डोक्यात घातला.

तर महेश टुले यानंही दुसरा एक दगड उचलून गणेश माकर याच्या डोक्यात घातला. या हल्ल्यात दोघंही गंभीर जखमी झाले, यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

याप्रकरणी पोलिसांनी मन्या उर्फ महेश संजय भागवत, महेश टुले आणि युवराज शिंदे यांच्यासह अन्य 4 ते 5 अज्ञात तरुणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Advertisement

नेमकं प्रकरण काय आहे ?

रविवारी रात्री दहाच्या सुमारास पाटस गावच्या हद्दीतील तामखडा येथील भानोबा मंदिराच्या परिसरातून मन्या उर्फ महेश संजय भागवत यानं शिवम संतोष शितकल याला फोन केला.

विनाकारण आई बहिणीवरून शिव्या देतो काय? मी कोण आहे आणि काय करू शकतो? हे तुला दाखवतो, अशी धमकी दिली.

त्यामुळे शिवम शितकल आपला मित्र गणेश रमेश माकर याला घेऊन तावातावानं तामखडा याठिकाणी गेला. पण आधीपासून हत्येच्या तयारीत असलेल्या टोळक्यानं दोघांची निर्घृण हत्या केली आहे.

Advertisement