ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

पवार, परब यांच्या सीबीआय चाैकशीची शाह यांच्याकडे मागणी

भारतीय जनता पक्षाने अजित पवार, अनिल परब यांच्या सीबीआय चाैकशीची मागणी करणारा ठराव केल्यानंतर आता प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी थेट गृहमंत्री अमित शाह यांना पत्र पाठवून सीबीआय चाैकशीची मागणी केली आहे. त्यासाठी सचिन वाझेच्या पत्राचा आधार घेतला आहे.

पवार, परब यांच्या अडचणींत वाढ ?

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या लेटर बॉम्बनंतर राज्यात राजकीय खळबळ उडाली.

अंबानी यांच्या घरासमोर ठेवलेली स्फोटके भरलेली कार, मनसुख हिरे यांचा खून या प्रकरणात निलंबित पोलिस वाझे यांच्या पत्राच्या आधारे पवार आणि परब यांच्याविरोधात सीबीआय चौकशीची मागणी करण्याचा ठराव भाजप प्रदेश कार्यकारिणी बैठकीत घेण्यात आला होता.

भाजपच्या या मागणीमुळे आता पवार आणि परब यांच्या अडचणी वाढणार का? असा सवाल आता उपस्थित होत आहे.

काय म्हटलं होतं भाजपच्या ठरावात ?

खरंतर, परमबीर यांच्या लेटर बॉम्बनंतर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे आता यामध्ये पवार आणि परब यांचीही चौकशी व्हावी अशी मागणी भाजपकडून करण्यात येत आहे. यामुळे पवार यांच्या अडचणी वाढणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांचे कारनामे सातत्याने उघडकीस येत आहेत. बदल्यांमधील भ्रष्टाचाराचे प्रकरण उघड झाल्यानंतर त्यानुसार कारवाई करण्याऐवजी हा भ्रष्टाचार उघड करणाऱ्यांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचे धक्कादायक प्रकार महाविकास आघाडी सरकारकडून चालू आहे, असं या ठरावात म्हटलं होतं.

 

You might also like
2 li