पेटीएम इन्शुरन्स ब्रोकिंग प्रायव्हेट लिमिटेड (पीआयबीपीएल) या डिजिटल वित्तीय सेवा प्लॅटफॉर्म पेटीएमच्या पूर्णपणे मालकीच्या उपकंपनीने तसेच वाढत्या विमा वितरक कंपनीने कार आणि बाईक विमा उत्पादने आणली आहेत.

कंपनीच्या परवडण्याजोग्या वाहन विमा योजना, १४ आघाडीच्या विमा कंपन्यांशी केलेल्या भागीदारीमार्फत, वापरकर्त्यांना देऊ केल्या जात आहेत.पॉलिसी खरेदी करण्यापूर्वी कोणतेही कागदपत्र अपलोड न करता हा प्लॅटफॉर्म वाहनमालकांना अखंडित सेवा देऊ करतो.

वाहनमालकांना विमा खरेदी करण्याचा आग्रह करणारे टेलिकॉल्सही यात येत नाहीत. या विमा उत्पादनांसाठी पेटीएम वॉलेट, पेटीएम, पोस्टपेड, पेटीएमयूपीआय, नेट बँकिंग, डेबिट वा क्रेडिट कार्ड आदी साधनांद्वारे पैसे भरले जाऊ शकतात.

Advertisement

पीआयबीपीएल निवडक वाहनांच्या मालकांना ओन डॅमेज कव्हरसाठी ८० टक्क्यांपर्यंत सवलत देऊ करत आहे. पीआयबीपीएल संपूर्णपणे डिजिटल प्रक्रियेद्वारे कॉ्प्रिरहेन्सिव, थर्ड-पार्टी ओन्ली, ओन डॅमेज ओन्ली पॉलिसीज विकत घेण्याचे पर्याय देऊ करते.

यासह कंपनी कार्ससाठी १४ तर दुचाकी वाहनांसाठी ६ ॲड-ऑन पर्याय देऊ करत आहे. यामध्ये झिरो डेप्रिसिएशन, इनव्हॉइस कव्हर, रोडसाइड असिस्टन्स आणि इंजिन प्रोटेक्ट यांचा समावेश आहे. हे सर्व पर्याय प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत.

कंपनी एका समर्पित सेवा पथकाच्या माध्यमातून दावा सहाय्य तसेच विमाखरेदी उत्तर सेवाही पुरवते, जेणेकरून वापरकर्त्यांना विनाकटकट सेवेचा अनुभव मिळावा. मोटर विमा उत्पादने पेटीएम ॲपवर (अँड्रॉइड व आयओएस), पेटीएम वेबसाईट व मोबाईल वेबसाईट तसेच वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

Advertisement

याबाबत पेटीएम इन्शुरन्स ब्रोकिंग लिमिटेडचे प्रवक्ते म्हणाले, इन्शुरन्स हे भारतात अद्याप दुर्लक्षित क्षेत्र आहे. उपलब्धता व परवडण्याजोगे दर यांना प्राधान्य देऊन यात बदल घडवून आणता येईल, अशी आशा पेटीएमला आहे. कार आणि बाइक विमा खरेदीची तसेच नूतनीकरणाची संपूर्ण प्रक्रिया सुलभ,

अखंडित आणि पूर्णपणे डिजिटल करण्यावर आम्ही लक्ष केंद्रित केले आहे. हा प्रवास केवळ २ मिनिटांचा आहे. पॉलिसी तत्काळ जारी केले जाते. ग्राहकांना सर्वोत्तम अनुभव देण्यासाठी आम्ही टेलीकॉलर्सचा उपयोग न करण्याचे धोरण जाणीवपूर्वक ठेवले आहे.

Advertisement