पिंपरी : मागील पाच वर्षात मोशी-जाधववाडी भागात विकासकामे झाली नाहीत,त्यामुळे भाजप (BJP) नगरसेवक वसंत बोराटे (Vasant Borate) यांनी राजीनामा दिला आहे. तसेच पुढील राजकीय भूमिका लवकरच स्पष्ट करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

आगामी महापालिका (Municipal Corporation) निवडणुकीच्या तोंडावर भाजप नगरसेवक वसंत बोराटे यांनी राजीनामा दिल्यानंतर राजकीय चर्चेला उधाण आले आहे. परंतु राजीनाम्याबद्दलची भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे.

ते म्हणाले की, मागील पाच वर्षात मोशी-जाधववाडीतील विविध आरक्षणे ताब्यात घेण्यासाठी शेवटपर्यंत प्रशासकीय ताकद मिळाली नाही. जाधववाडी आणि मोशीतील ग्रीन झोन (Green zone) हे रहिवासी झोन होणे आवश्यक होते ते झाले नाही.

Advertisement

त्यामुळे विकास कामांना गती मिळाली नाही. अपेक्षित कामे झाली नाहीत. त्यामुळे या भागातील नागरिकांसाठी मी भाजप(BJP) नगरसेवकपदाचा (Corporator)राजीनामा दिला आहे, असे बोराटे (Vasant Borate)यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

तसेच पक्षात काम करताना स्वाभिमान दुखावला जात होता. शेवटपर्यंत सन्मान दिला नाही. सन्मानाने वागविले नाही. अशीच मानसिकता आणि खदखद अनेक नगरसेवकांच्या मनात आहे. परंतु, ते स्पष्टपणे व्यक्त करू शकत नाहीत.

मोशी-जाधववाडी भागाच्या विकासासाठी, जनतेसाठी मला हा निर्णय घ्यावा लागत आहे. असे सांगत त्यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे भाजप नगरसेवकपदाचा राजीनामा दिला आहे.

Advertisement