पुणे : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Pune District Central Co Operative Bank Election) निवडणुकीचा निकाल (Election Result) नुकताच लागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेच्या (NCP) २१ पैकी १६ जागा निवडून आल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता आली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सर्व जागा जिंकण्याचा प्रयत्न केला मात्र अजित पवारांच्या बारामतीतूनच (Baramati) मतदान फुटल्यामुळे त्यांचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही.

१५ जानेवारीला अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणूक होणार आहे. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बँकेच्या अध्यक्ष पदासाठी ३ नवे चर्चेत आहेत. आमदार अशोक पवार, विकास दांगट आणि दिगंबर दुर्गाडे यांची नावे चर्चेत आहेत.

Advertisement

यावेळी बँकेच्या अध्यक्षपदासाठी (District Bank Chairman) नव्या चेहऱ्याला संधी मिळण्याचे संकेत दिसत आहेत. त्यामुळे अजित पवार कोणाला संधी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार अशोक पवार 73 मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपच्या आबासाहेब गव्हाणे यांचा पराभव केला आहे.

तर राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील चांदेरे हे 27 मतांनी विजयी झाले आहेत. चांदेरे यांनी भाजपचे आत्माराम कलाटे यांना पराभूत केलं आहे. हवेलीच्या जागेसाठी झालेल्या मैत्रीपूर्ण लढतीमध्ये राष्ट्रवादीचे विकास दांगट विजयी झाले आहेत.

Advertisement

याशिवाय राष्ट्रवादीच्या पूजा बुट्टे पाटील आणि निर्मला जागडे यांचा विजय झाला, तर आशा बुचके यांना पराभवाचा धक्का बसला. तर राहिलेल्या उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे.

आमदार अशोक पवार, विकास दांगट आणि दिगंबर दुर्गाडे या तिघांची नवे चर्चेत असल्यामुळे अजित पवार कोणाला पसंती देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Advertisement