पुणे : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Pune District Central Co Operative Bank Election) निवडणुकीचा निकाल (Election Result) नुकताच लागला आहे. राष्ट्रवादी काँग्रेच्या (NCP) २१ पैकी १६ जागा निवडून आल्या आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता आली आहे.

अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत एकहाती सत्ता मिळवली आहे. २१ पैकी १६ जागा राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकल्या आहेत.

त्यामुळे जिल्हा बँकेची सत्ता राष्ट्रवादी काँग्रेसच्या हाती गेली आहे.१५ जानेवारीला अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणूक होणार आहे. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement

बँकेच्या अध्यक्ष (Chairman) पदासाठी ३ नवे चर्चेत आहेत. अजित पवार यांनी अध्यक्षपदाच्या निवडीसाठी बैठक बोलावली आहे.

उद्या दुपारी १ वाजता अजित पवार संचालक मंडळांची जिल्हा बँकेत बैठक घेणार आहेत. यावेळी बँकेच्या अध्यक्षपदासाठी (District Bank Chairman) नव्या चेहऱ्याला संधी मिळण्याचे संकेत दिसत आहेत.

आमदार अशोक पवार, विकास दांगट आणि दिगंबर दुर्गाडे यांची नावे चर्चेत आहेत. त्यामुळे अजित पवार कोणाला संधी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार अशोक पवार 73 मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपच्या आबासाहेब गव्हाणे यांचा पराभव केला आहे.

तर राष्ट्रवादीचे (NCP) उमेदवार सुनील चांदेरे हे 27 मतांनी विजयी झाले आहेत. चांदेरे यांनी भाजपचे आत्माराम कलाटे यांना पराभूत केले आहे. हवेलीच्या जागेसाठी झालेल्या मैत्रीपूर्ण लढतीमध्ये राष्ट्रवादीचे विकास दांगट विजयी झाले आहेत.

याशिवाय राष्ट्रवादीच्या पूजा बुट्टे पाटील आणि निर्मला जागडे यांचा विजय झाला, तर आशा बुचके यांना पराभवाचा धक्का बसला. तर राहिलेल्या उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे.

Advertisement

आमदार अशोक पवार, विकास दांगट आणि दिगंबर दुर्गाडे या तिघांची नवे चर्चेत असल्यामुळे अजित पवार कोणाला पसंती देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.