पुणे : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदासाठी (Pune District Bank Chairman Election) आज (दि. १५ ) निवडणूक झाली आहे. त्यासाठी अजित पवार (Ajit Pawar) यांनी दुपारी संचालक मंडळाची (Board of Directors) बैठक बोलावली होती.

जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेचे (NCP) आमदार अशोक पवार, आमदार दिलीप मोहिते पाटील आणि माजी आमदार रमेश थोरात ही नावे चर्चेत होती.

मात्र, अजित पवार यांनी दिगंबर दुर्गाडे (Digambar Durgade) यांच्या नावावर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी शिक्कामोर्तब केले आहे. तर उपाध्यक्षपदासाठी सुनील चांदेरें (Sunil Chandere) यांची निवड करण्यात आली आहे.

Advertisement

दिगंबर दुर्गाडे यांनी याअगोदरही जिल्हा बँकेचे अध्यक्षपद भूषवले आहे. अजित पवार यांनी निवडून आलेल्या संचालकांची बैठक घेतली त्यामध्ये ही नावे निश्चित करण्यात आली आहेत.

जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी अजित पवार यांनी आज दुपारी बैठक बोलावली होती. ही बैठक जवळ जवळ १ तास चालली आहे. यामध्ये पवारांनी इच्छुकांची मते जाणून घेतली असल्याची माहिती मिळत आहे.

अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत एकहाती सत्ता मिळवली आहे. २१ पैकी १६ जागा राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) जिंकल्या आहेत.

Advertisement