पुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदासाठी (Pune District Bank Chairman Election) निवडणूक आज होणार आहे. त्यासाठी अजित पवार (Ajit Pawar) यांनी दुपारी संचालक मंडळाची (Board of Directors) बैठक बोलावली आहे. दुपारी एक वाजता यासाठी निवडणूक होणार आहे.

अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत एकहाती सत्ता मिळवली आहे. २१ पैकी १६ जागा राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) जिंकल्या आहेत.

जिल्हा बँकेची सत्ता राष्ट्रवादी काँग्रेसच्या हाती आली आहे. आज अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणूक होणार आहे. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अजित पवार कोणाला संधी देणार यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

Advertisement

बँकेच्या अध्यक्ष (Chairman) पदासाठी ३ नवे चर्चेत आहेत. अजित पवार यांनी अध्यक्षपदाच्या निवडीसाठी बैठक बोलावली आहे. त्या बैठकीत अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी चर्चा होणार आहे.

अजित पवार यावेळी कोणत्या नव्या चेहऱ्याला संधी देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची नव्या चेहऱ्याला संधी देण्याची रणनीती ठरली असल्याचेही सांगण्यात येत आहे.

जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेचे आमदार अशोक पवार, आमदार दिलीप मोहिते पाटील आणि माजी आमदार रमेश थोरात ही नावे सध्या चर्चेत आहेत.

Advertisement

उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासाठी कोणाच्या नावाला पसंती देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.