महाविकास आघाडी सरकारच्या चुकीच्या कारभाराला जनता कंटाळली आहे. त्यामुळे हीच जनता आगामी निवडणुकीत भाजपाच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिल, असा विश्वास जिल्हा संघटन सरचिटणीस ॲड.धर्मेंद्र खांडरे यांनी व्यक्त केला.

शुक्रवारी (दि.११) जुन्नर तालुका भाजपची संघटनात्मक बैठक ओतूर येथे तालुकाध्यक्ष संतोष तांबे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा संघटन सरचिटणीस ॲड.धर्मेंद्र खांडरे,भाजपा किसान मोर्चा पुणे जिल्हाध्यक्ष संजय थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.

यावेळी ते बोलत होते. बैठकीत तालुक्यातील बुथ बांधणीचा आढावा घेण्यात आला.आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने ही महत्वपूर्ण बैठक झाली. तसेच पेट्रोल दरवाढीवरुन केंद्र सरकारला दोष देण्याआधी राज्य सरकारला पेट्रोलवर लावलेला २७ टक्के व्हॅट कमी करायला सांगा,

असा टोला तालुकाध्यक्ष संतोष तांबे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसने नारायणगाव येथे केलेल्या आंदोलनावरुन लगावला. विम्याबाबत शेतकऱ्यांची फसवणूक खपवून घेणार नाही,असेही सांगण्यात आले. यावेळी ओबीसी मोर्चाचे तालुकाध्यक्ष रामदास शिंदे यांनी भाजपाची ओबीसी कार्यकारिणी जाहीर केली.

संजय माळवे ,मयूर गोसावी, केदार बारोळे, प्रशांत सासवडे, विशाल पेंडभाजे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.याप्रसंगी भाजप जिल्हा सचिव रोहिदास भोंडवे, अनुसूचित जमाती जिल्हाध्यक्ष मधुकर काठे, हरिष भवाळकर,मीडिया सदस्य निलेश गायकवाड,

तालुका सरचिटणीस मयुर तुळे , जुन्नर शहराध्यक्ष गणेश बुट्टे पाटील, संपर्कप्रमुख नवनाथ हांडे, ओबीसी मोर्चा तालुकाध्यक्ष रामदास शिंदे, उपाध्यक्ष दत्तात्रय डुंबरे, संजीवनी हांडे, सतिष बांबळे आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रशांत पाबळे यांनी केले.