ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

वेळ, लोक साधून ‘ईडी’ च्या कारवाया

ईडीच्या कारवाया वेळा साधून होत आहेत. त्यावर प्रश्न निर्माण होत आहे. ठरावीक पक्ष आणि लोकांवरच कारवाया होत आहेत. हे जास्तच साधून आलंय, अशी टीका शिवसेनेच्या नेत्या ऊर्मिला मातोंडकर यांनी केली.

राठोडांच्या मंत्रिमंडळातील समावेशाच्या केवळ चर्चा

मातोंडकर यांच्या हस्ते शिवसेनेच्या शिवसंपर्क मोहिमेचं उद्घाटन करण्यात आलं. शिवसेना नेते संजय राठोड यांच्या मंत्रिमंडळातील पुनरागमनाच्या चर्चा आहेत.

त्यावरही त्यांनी भाष्य केलं. राठोड मंत्रिमंडळात येणार का? या चर्चा केवळ प्रसारमाध्यमात आहेत. तुम्ही लोक यावर चर्चा करत आहात, असं त्या म्हणाल्या

चित्रा वाघ यांचा समाचार

या वेळी त्यांनी विधान परिषद सदस्यांच्या नियुक्तीवर बोलण्यास नकार दिला. मला यावर बोलायचं नाही, असं त्या म्हणाल्या. ‘सामना’बाबत शिवसेना नेते संजय राऊतच अधिक माहिती देतील.

तो त्यांचा अधिकार आहे. दुसऱ्या कुणाला अधिकार नाही. शिवसेनेत नसलेल्या लोकांनी तर त्यावर बोलूच नये, अशा शब्दांत त्यांनी भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा समाचार घेतला.

स्वबळाचा निर्णय नेतृत्वच घेईल

त्यांना स्वबळावर निवडणुकांबाबत विचारण्यात आलं, तेव्हा ‘निवडणुका स्वबळावर लढवाव्यात की एकत्रितपणे याचा निर्णय आमचं नेतृत्व घेईल,’ असं सांगतानाच शिवसंपर्क मोहिमेद्वारे शिवसेना घराघरात पोहोचणार असल्याचं मातोंडकर यांनी सांगितलं.

ठाकरेंसारखा मुख्यमंत्री झाला नसता

शिवसेना नेहमीच मदतीसाठी पुढे आली आहे. कोरोना काळात तर शिवसेनेने लोकांना मदत केली आहे. शिवसेना सत्तेत आली, त्यामुळे एक सुवर्ण पान उलगडलं गेलं.

कोणत्याही नेतृत्वासाठी, पक्षासाठी हा काळ अत्यंत महत्त्वाचा असतो. पडत्या आणि वाईट काळात संघटन आणि नेतृत्व कसं आहे हे कळतं. तसंच ते सत्तेत असतानाही कळतं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना संकटाची परिस्थिती यशस्वीपणे हाताळली. अशा काळात त्यांच्या सारखा मुख्यमंत्री झाला नसता, हे त्यांनी त्यांच्या कार्यानं दाखवून दिलं आहे, असंही त्यांनी सांगितलं.

 

You might also like
2 li