पुणे : महानगरपालिकेचे (Pune Muncipal Corporation) माजी महापौर प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांनी नितेश राणेंवर (Nitesh Rane) नाव न घेता टीका केली आहे. ट्विट करत त्यांनी राणे यांना खोचक टोला लगावला आहे.

शिवसैनिक संतोष परब (Satntosh Parab) वरील हल्ल्यात अटकेची टांगती तलवार असलेल्या आमदार नितेश राणे यांच्यावर विरोधकांनी टीकेचे झोड उठवण्यास सुरुवात केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पुणे महानगरपालिकेचे माजी महापौर प्रशांत जगताप यांनी ट्विट (Twit) मध्ये म्हंटले आहे की, लोकांना वाटतंय ते दिल्लीला पळून गेले,कसं शक्य आहे ? कोंबडीच्या पंखात एवढं बळ नसतं.

Advertisement

Advertisement

नितेश राणे यांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयात धाव घेतली आहे. या निर्णयावर मंगळवारी सुनावणी होणार आहे. नितेश राणे हे सध्या नॉटरिचेबल आहेत.

ते सध्या कुठे आहेत. हे कोणालाच माहिती नाही. राणे यांना शोधण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक वेगवेगळ्या पथकांच्या माध्यमातून प्रयत्न करत आहेत. विशेष म्हणजे सिंधुदुर्गात (Sindhudurg) जिल्हा बँक निवडणूक आहे.

या निवडणुकीमुळे शिवसेना (Shivsena) विरुद्ध राणे यांच्यामध्ये चांगलेच रान पेटले आहे. नितेश राणे हे ३ दिवस झाले गायब असल्यामुळे त्यांच्यावर टीकास्त्र सुरु आहेत.

Advertisement