कोरोनाच्या काळात एकीकडे जेथे लोकांच्या नोकर्‍या जात आहेत. तसेच दुसरीकडे, काही राज्य सरकार आणि आयोग काही रिक्त पदांसाठी भरती करत आहेत. पंजाब स्टेट पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (पीएसपीसीएल) देखील असेच काम करीत आहे. सरकारकडून पीएसपीसीएलमधील क्लार्क , रेवेन्यू अकाउंटंट , जूनियर इंजीनियर, असिस्टंट लाइनमॅन आणि असिस्टंट सब स्टेशन अटेंडंट पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे.

यात एक मोठे अपडेट असे आहे कि , सरकारने 25 जुलैपर्यंत अर्ज करण्याची अंतिम तारीख वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. अशा परिस्थितीत पात्र आणि इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट pspcl.in वर जाऊन अर्ज करू शकतात.

बम्पर भरती

एकूण 2632 पदांसाठी भरती होत आहे. यामध्ये 549 जागा क्लार्क पदासाठी आहेत. त्याचबरोबर 1700 जागा असिस्टंट लाइनमॅनसाठी आहेत. याशिवाय असिस्टंट सब स्टेशन अटेंडंटसाठी 290 जागा , जुनिअर इंजिनिअरसाठी 75 आणि अकाउंटंटसाठी 18 जागा उपलब्ध आहेत.

Advertisement

कोण अर्ज करू शकेल

वेगवेगळ्या पदांसाठी विविध पात्रता मागविल्या गेल्या आहेत. सर्वात कमी पात्रता लाइनमॅनची आहे. दहावी पास देखील या पदासाठी अर्ज करू शकतात . त्याच वेळी, आयटीआय पास उमेदवार असिस्टंट सब स्टेशन अटेंडंटसाठी देखील अर्ज करू शकतात.

तथापि, या पदासाठी किमान 2 वर्षांचा इंटर्नशिपचा अनुभव असावा. त्याच वेळी, इंजिनिअरिंग डिप्लोमा असलेले उमेदवार जुनिअर इंजिनिअरसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करणा-या उमेदवाराचे वय 17 ते 37 वर्ष असावे.

अर्ज कसा करावा

अर्ज करण्यासाठी उमेदवारांना पीएसपीसीएलच्या अधिकृत वेबसाइट, pspcl.in वर भेट द्यावी लागेल. येथे आपल्याला अर्ज करण्यासाठी लिंक सापडेल. वेबसाईटवरील माहिती भरा आणि फॉर्म सबमिट करा. अनुसूचित जाती आणि पीडब्ल्यूडी उमेदवारांना 590 रुपये फी भरावी लागेल. त्याचबरोबर इतर उमेदवारांना 944 रुपये फी भरावी लागेल.

Advertisement

निवड कशी होईल

निवडीसाठी एकूण चार टप्पे पार करावे लागतील. सर्वप्रथम आपल्याला पीएसपीसीएलची पूर्वपरीक्षा उत्तीर्ण करावी लागेल. यानंतर आपल्याला मुख्य परीक्षा द्यावी लागेल. शेवटी गुणवत्ता यादी तयार केली जाईल आणि निवडलेल्या उमेदवारास कागदपत्र पडताळणी करावी लागेल.