पुणे – गेल्या काही महिन्यांत देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत (Petrol-Diesel Price) प्रचंड वाढ झाली आहे. इंधनाचे दर सातत्याने वाढत असल्यामुळे सामान्य नागरिक त्रस्त आहेत. दररोज वाढ होत असल्याने पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-Diese) किमती नवनवीन विक्रम करत आहेत. आजच्या घडीला बोलायचं झालं तर महाराष्ट्रातील (maharashtra) प्रत्येक शहरात पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-Diese Price) किंमतीचा भडका उडताना दिसत आहे.

दररोज सकाळी ६ वाजताच्या सुमारास पेट्रोल आणि डिझेलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात,

जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर.

Advertisement

आज (दि. १२) गुरुवारी सकाळी सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे नवे रेट (Petrol-Diesel Prices Today) जारी केले आहेत.

आज किमतीत कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. यादरम्यान ग्लोबल मार्केटमध्ये ब्रेंट क्रूडची किंमत ६ डॉलरने वाढून १०७ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचली आहे.

तेल कंपन्यांनी ६ एप्रिल रोजी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ केली होती. त्यादरम्यान केवळ १५ दिवसांत तब्बल १४ वेळा इंधन दर वाढवण्यात आला होता.

Advertisement

या १४ दिवसांत एकूण १०.२० रुपये प्रति लीटरची वाढ झाली होती. त्यानंतर दिल्लीत पेट्रोल १०५ तर मुंबईत १२० रुपये प्रति लीटर आहे. तर पुणे शहरात आज पेट्रोल ११९ रुपये प्रति लीटर आहे.

दरम्यान, जेव्हा-जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या दरात मोठी वाढ झाल्याचे दिसून येते. आणि याचा फटका तुमच्या-आमच्या सारख्या सामान्य नजतेला बसतो.

एसएमएसद्वारे जाणून घ्या दर तुमच्या शहरातील ‘पेट्रोल-डिझेल’चे दर

Advertisement

इंडियन ऑइलचे ग्राहक RSP सोबत <डीलर कोड> ९२२४९९२२४९ वर पाठवून माहिती मिळवू शकतात आणि BPCL चे ग्राहक RSP 9223112222 वर लिहून माहिती मिळवू शकतात.

त्याच वेळी, HPCL ग्राहक ९२२२२०११२२ या क्रमांकावर HP Price पाठवून किंमत जाणून घेऊ शकतात.

Advertisement