पुणे महापालिकेच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक होण्याबाबत संभ्रम असला, तरी प्रशासन सज्ज झाले आहे.

मतदार यादीतील छायाचित्र अद्ययावतीकरणाचे कामे सध्या सुरू झाली असून, यामध्ये एकट्या वडगाव शेरी विधानसभा मतदार संघातील ७० हजार ७४१ मतदारांची छायाचित्रे मतदार यादीमधून गायब झाली आहेत.

मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण सुरू

पुणे महापालिकेच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार मतदार यादीतील छायाचित्र अद्ययावतीकरणाचे काम सध्या सुरू झाले आहे.

Advertisement

यात वडगाव शेरीमध्ये विधानसभा मतदारसंघाच्या ४३० यादी भागातील ७० हजार ७४१ मतदारांची छायाचित्रे नसलेली यादी, पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या व पुणे महापालिकेच्या संकेतस्थळावर पाहण्यास उपलब्ध करून देण्यात आली आहे.

ज्या मतदारांची छायाचित्रे मतदार यादीत नाहीत, त्यांनी पुढील सात दिवसांत रंगीत छायाचित्र रहिवाशी पुराव्यासह येरवडा क्षेत्रीय कार्यालयात जमा करावीत, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी संदीप कदम यांनी केले आहे.

Advertisement