पुणे – दोन दिवसांपूर्वी पिंपळे सौदागर (Pimpari Chinchwad Crime) येथे एक मोठी घटना घडली असून, या घटनेमुळे एकच खळबळ निर्माण झाली आहे. मटणाच्या सूपमध्ये (Mutton Soup) भात आल्याने दोघांनी वेटरची हत्या केली, तर दोघे जखमी (Crime) झाले आहेत. पिंपळे सौदागर येथील सासुरवाडी हॉटेलमध्ये ही घटना (Crime) घडली. मंगेश पोस्ते असं 19 वर्षीय मयत वेटरचं नाव होतं.

तर अजित मुटकुळे आणि सचिन भवर अशी जखमींची नावं आहेत. विजय वाघेरे आणि त्याच्या साथीदाराने या तिघांना लाकडी दांडक्याने मारहाण केली. ही घटना सीसीटीव्हीतही कैद (Crime) झाली होती.

आणि त्याच आधारे पोलिसांनी(Police) आता आरोपीना अटक केली आहे. खून (Crime) करणाऱ्या दोन आरोपींना अटक करून 23 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. अशी माहिती दिलीप जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक, सांगवी पोलीस ठाणे यांनी दिली आहे.

पिंपळे सौदागर येथे एक मटणाचे हॉटेल आहे. आरोपी विजयराज आणि त्याचा मित्र नेहमी इथे जेवायला येत असत. मंगळवारी मटणाच्या सूपमध्ये (Mutton Soup) भाताचे काही कण आढळले.

यामुळे आरोपींनी वेटर अजित मुठकुळे, सचिन भवर आणि मृत मंगेशला शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. यात मंगेश गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू (Crime) झाला.

दरम्यान, या आरोपींच्या बद्दल माहिती देताना, जाधव म्हणाले की, “विजयराज वाघिरे, वय 23 वर्ष, रा. पिंपरीगाव याला आज अटक करण्यात आले आहे.

तर त्याच्या साथीदाराला काल अटक करण्यात आले आहे. दोघांना आज पिंपरी कोर्टात हजर करण्यात आले होते व त्यांना 23 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.”

या प्रकरणी विशाल रजाळे, वय 21 वर्षे, रा. सासूरवाडी हॉटेल च्या बाजूला काटे वस्ती पिंपळे सौदागर पुणे, मूळ रा. कोसगाव, तालुका भोकरदन जिल्हा जालना यांनी सांगली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.