पुणे – पुण्यात (Pune) सध्या गुन्हेगारीचं (Crime Rate) प्रमाणात मोठ्या संख्येनं वाढत असून, अनेक तरुण मुलं या गुन्हेगारीच्या जाळ्यात (Crime Rate) अडकत चालायचं दिसून येत आहे. आणि याच कारणामुळे शहरात दिवसागणतीत अनेक लहान-मोठे गुन्हे घटना दिसून येतात. नुकतंच पिंपळे सौदागर (Pimpari Chinchwad Crime) येथे एक मोठी घटना घडली असून, या घटनेमुळे एकच खळबळ निर्माण झाली आहे.

मटणाच्या सूपमध्ये (Mutton Soup) भात आल्याने दोघांनी वेटरची हत्या केली आहे, तर दोघे जखमी (Crime) झाले आहेत. पिंपळे सौदागर येथील सासुरवाडी हॉटेलमध्ये ही घटना काल रात्री घडली. मंगेश पोस्ते असं 19 वर्षीय मयत वेटरचं नाव होतं.

तर अजित मुटकुळे आणि सचिन भवर अशी जखमींची नावं आहेत. विजय वाघेरे आणि त्याच्या साथीदाराने या तिघांना लाकडी दांडक्याने मारहाण केली. ही घटना सीसीटीव्हीतही कैद झाली आहे. त्याच आधारे सांगवी पोलीस (Police) या तिघांचा शोध घेत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपळे सौदागर येथे एक मटणाचे हॉटेल आहे. आरोपी विजयराज आणि त्याचा मित्र नेहमी इथे जेवायला येत असत. मंगळवारी मटणाच्या सूपमध्ये (Mutton Soup) भाताचे काही कण आढळले.

यामुळे आरोपींनी वेटर अजित मुठकुळे, सचिन भवर आणि मृत मंगेशला शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. यात मंगेश गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

हा सर्व प्रकार सीसीटीव्हीतही कैद झाला. गंभीर जखमी मंगेशला लगतच्याच खाजगी रुग्णालयात त्याला दाखल केले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

तर अजित आणि सचिनवर उपचार सुरू आहेत. सांगवी पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी विजय आणि त्याच्या साथीदारावर गुन्हा दाखल झाला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.