पिंपरी चिंचवड – पिंपरी चिंचवड (Pimpari-Chinchwad) महानगरपालिकेच्या स्थायी आस्थापनेवरील वैद्यकीय विभागातील विविध रिक्त पदे (PCMC Jobs) सरळसेवा प्रवेशाने भरण्याकरीता घेण्यात आलेल्या परीक्षेचा पदनिहाय निकाल लागलेला आहे. www.pcmcindia.gov.in या महापालिकेच्या अधिकृत (Official Website) संकेतस्थळावर हा निकाल नुकताच प्रसिध्द करण्यात आला आहे.

याबाबत संबंधित उमेदवारांनी याची नोंद घ्यावी. ते उमेदवार पिंपरी चिंचवड (Pimpari-Chinchwad) महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन निकाल बघू शकतात.

या पदांसाठी दि. 25 जून 2022 रोजी ऑनलाईन परीक्षा घेण्यात आलीये. दरम्यान या परीक्षेचा निकाल आता प्रसिद्ध करण्यात आलेला आहे.

Advertisement

दरम्यान, पदनिहाय उमेदवारांच्या कागदपत्रांच्या पडताळणीसाठी त्यांच्या नावांसह वेळापत्रक महापालिकेच्या संकेतस्थळावर जाहीर केले जाईल.

त्याबाबत उमेदवारांशी पत्रव्यवहार केला जाणार नाही. त्यामुळे उमेदवारांनी भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वेळोवेळी संकेतस्थळावरील सूचना पाहाव्यात. असे महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी सांगितले आहे.

‘ही’ पदे भरण्याकरिता परीक्षा घेण्यात आली होती –

Advertisement

1. क्ष किरण शास्रज्ञ

2. टी.बी. अँड चेस्ट फिजिशियन

3. वैद्यकीय अधिकारी

Advertisement

4. स्टाफनर्स

5. सांख्यिकी सहाय्यक

6. लॅब टेक्निशियन

Advertisement

7. एक्स रे