पुणे : शहरात गुन्हेगारीचे प्रमाण अधिक वाढत आहे. अशातच पिंपरी चिंचवड (Pimpari Cinchavad) येथे एका अल्पवयीन मुलाची गोळी झाडून हत्या (Mruder) केल्याची धक्कादायक घटना समोर आली होती.

अवघ्या काही तासांमध्ये पोलिसांनी अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची (Student) हत्या करणाऱ्या आरोपीला पकडले आहे. हत्या करणारा दुसरा तिसरा कोणी नसून मयत विद्यार्थ्यांचा सख्खा चुलत भाऊ असल्याचे उघड झाले आहे.

पोलिसांना (police) प्रथमदर्शनी पाहिल्यावर गोळी मारून हत्या केली आहे असे वाटले. परंतु लोखंडी हातोड्याने आधी विद्यार्थ्याच्या डोक्याच्या मागून आणि नंतर डोळ्यावर प्रहार करण्यात आला होता. त्यामुळे बंदुकीची गोळी झाडून हत्या केल्याचे दिसून येत होते.

Advertisement

मयत विद्यार्थी नेहमी खुन्नस देत धमकावायचा, तसेच काही दिवसांपूर्वी फक्त 302 अशा आशयाचे स्टेटसही त्याने ठेवले होते. हे स्टेटस (Status) फक्त दोन्ही आरोपींनाच दिसत होते.

त्यामुळे रागीट स्वभावाच्या विद्यार्थ्यावर त्याचा 19 वर्षीय सख्खा चुलत भाऊ कमलेश आणि त्याचा मित्र प्रकाश लोहार (वय 19 वर्ष) खार खाऊन होते. यातूनच विद्यार्थ्याचा काटा काढायचा कट या दोघांनी रचला होता.

पोलिसांच्या तपासात मयत विद्यार्थ्यांच्याच भावाने हत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या (Talegaon Dabhade Police Station) ​काही अंतरावरच ही घटना घडली असल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Advertisement