पिंपरी चिंचवड – राज्यातील अपघात सत्र (Maharashtra Accident Latest News) काही केल्या कमी होताना दिसत नाहीये उलट गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर राज्यात अपघात होताना दिसून येत आहेत. ऐन दिवाळीच्या तोंडावर पिंपरी चिंचवड शहरात भीषण अपघात घडला असून, हा अपघात (Accident) इतका भयानक होता की… यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पिंपरी चिंचवड शहरातील इंदिरा गांधी उड्डाणपुलावर (Pimpri accident) आज शनिवारी सकाळच्या सुमारास एक अपघात घडला.

टाटा सफारी कार पिंपरी (Pimpri accident) उड्डाणपुलाच्या कठड्याला धडकून अडकल्याची घटना घडली आहे. सुदैवाने गाडी खाली पडली नसल्याने कुणीही जखमी झाली असून, या अपघातामुळे (Accident) नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भाटनगरवरून पिंपरीच्या दिशेला जाणार्‍या रस्त्यावर एक काळ्या रंगाची सफारी कार उड्डाणपुलाला धडकल्याने हा अपघात झाला. सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झालेले नाही. ही गाडी उड्डाणपुलावरून खाली नं पडल्याने मोठा अनर्थ टळला.

मात्र, या उड्डाणपूलाखालून ये-जा करणार्‍या नागरिकांना गंभीर दुखापत होण्याची शक्यता होती. या अपघातात गाडीचे चांगलेच नुकसान झाले आहे. मात्र हा अपघात धडकी भरवणारा होता हे नक्कीच.

अर्जुन पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक, चिंचवड वाहतूक विभाग यांनी सांगितले की एक, टाटा सफारी कार उड्डाणपुलावर बाजूला पार्क केली होती. कार चालकाला जिम ला जायचे असल्याने त्याने कार चालू करताना चुकून ऍक्सेलेरेटर दाबला गेल्याने वेग वाढला व कार उड्डाणपुलाच्या कठड्याला धडकली.

सिमेंट चे जाड व मोठे कठडे असल्याने कार धडकून अडकली. हा अपघात आज सकाळी 7.30 ते 8 वा चे दरम्यान व्यंकटेश मार्केट जवळ घडला होता. उड्डाणपुलाच्या खाली घरे व दुकाने आहेत.

कार त्यांच्यावर पडली असती तर मोठी दुर्घटना होऊन माणसे जखमी झाली असती. वाहतूक विभागाचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आहेत. क्रेन बोलावण्यात आले आहे व कारला बाहेर काढले.