पिंपरी-चिंचवड – जगभरात गेल्या दोन वर्षापासून करोनाने (corona) अक्षरशः थैमान घातला होता. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात करोना विषाणूचा प्रादुर्भाव (Corona Update) कमी झाल्याचं चित्र पाहायला मिळत असतानाच आता, पुन्हा एकदा करोना विषाणूननं आपलं डोक वर काढलं आहे. राज्यात करोनाचा (Corona Update) विषाणूचा प्रसार दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.

रुग्णांमध्ये देखील झपाट्याने होत असून, संभाव्य चौथ्या लाटेची चिंता व्यक्त केली आहे. पिंपरी-चिंचवड (pimpri chinchwad ) शहरातील करोनाच्या रुग्णसंख्येतील वाढ सुरुच आहे.

शहराच्या विविध भागातील 212 नवीन करोना बाधित रुग्णांची आज नोंद झाली. तर, करोनामुक्त (Corona Update) झालेल्या 168 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

करोनामुळे महापालिका हद्दीतील एकाही रुग्णाचा आज मृत्यू झाला नाही. आजपर्यंत शहरातील 4 हजार 624 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला.

शहरातील 3 लाख 62 हजार 486 जणांना आजपर्यंत करोनाची लागण झाली. सध्या 1 हजार 127 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 1 हजार 81 रुग्ण गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत.

तर, 46 रुग्ण महापालिका रुग्णालयामध्ये दाखल आहे. तर काल दिवसभरात 1 हजार 837 नागरिकांचे लसीकरण झाले. आजपर्यंत 36 लाख 56 हजार 551 जणांनी करोना प्रतिबंधक लस घेतली.

आरोग्य विभागाने सुद्धा काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. करोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून, नागरिकांची सुद्धा (Corona Update) डोकेदुखी वाढली आहे.