पुणे – चार वर्षांच्या चिमुरडीला चॉकलेटचं (chocolate) आमीष दाखवून अपहरण (girl Kidnapping) केल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) परिसरात घडली आहे. या अपहरणप्रकरणी एका 42 वर्षांच्या इसमासह त्याच्या पत्नीलाही पोलिसांनी (Pimpri Chinchwad) अटक केली आहे. दरम्यान, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ निर्माण झाली असून, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, ही मुलगी पिंपरी चिंचवड येथील चिखलीत राहत होती. शेजारच्या घरात असलेल्या चार वर्षांच्या या मुलीचं अपहरण (Kidnapping) करण्यात आलं होतं.

शेजारी राहत असलेल्या महिलेची बहीण आणि तिचा मुलगा चिखलीत राहायला आले होते. त्यावेळी संशयित आरोपी असलेल्या महिलेच्या मुलानं या चार वर्षांच्या मुलीला चॉकलेटचं (chocolate) आमीष दाखवलं आणि तिला बाहेर आणलं.

त्यानंतर त्याने या मुलीला आईच्या हवाले केलं. अखेर चार वर्षांच्या मुलीला आपल्या ताब्यात घेत संशयित आरोपी महिला जुन्नरला पळून आली. शनिवारी दुपारी ही घटना घडली होती.

दरम्यान, बहीण आणि तिचा मुलगा घरी परतल्या नंतर त्यांना आपली मुलगी कुठेच आढळून येत नसल्यानं त्यांना शंका आली. त्यामुळे त्यांनी अखेर पोलिसांत तक्रार दिली.

या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासलं आणि त्यात या मुलीचं अपहरण झालं असल्याचं निष्पन्न झालं. अखेर पोलिसांनी मोठ्या शिताफीनं अवघ्या काही तासांच्या आत मुलीची सुटका केली आहे.

मात्र, या अपहरणामागे नेमका हेतू कोणता होता, याचा तपास पोलिसांकडून केला जातोय. दरम्यान, चार वर्षांच्या मुलीचं अपहरण झाल्याचं कळल्यानंतर पोलिसांनी लगेचच गंभीर पावलं उचलली,

त्यामुळे या मुलीला सुखरुप पुन्हा तिच्या नातलगांकडे सुपूर्द करण्यात आलंय. पिंपरी चिंचवड पोलिस अधिकारी अंकुश शिंदे यांनी या घटनेची माहिती दिली आहे.

दरम्यान, यापूर्वी देखील पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) शहर आणि इतर परिसरात या प्रकारच्या अनेक धक्कादायक घटना घडल्याचं पाहायला मिळालं आहे.