पिंपरी चिंचवड – पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad Crime) परिसरात पोलिसांनी एक मोठी कारवाई केली असून, या करवाईनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad police) पोलीस आयुक्तालयाअंतर्गत येणाऱ्या वाकडमध्ये पोलिसांनी एका हॉटेलात धाड टाकून वेश्या व्यवसाय (Human Trafficking) करणाऱ्यांचा पर्दाफाश केलाय. या कारवाई अंतर्गत तिघा महिलांची सुटका करत दोघा महिलांवर गुन्हादेखील (crime news) नोंदवून घेतला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड शहर परिसरातील वाकडमध्ये एका नामांकित हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय सुरु होता. व्हॉट्सअपवरुन या वेश्या व्यवसायाचं रॅकेट (Human Trafficking) चालवलं जात होतं.

ग्राहकांशी व्हॉट्सअपवरच संपर्क करुन त्यांना हॉटेलात बोलावलं जात होता. दरम्यान, यावेळी पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी सापळा रचून वेश्या व्यवसाय चालू असणाऱ्या हॉटेलात अचानक धाड मारली आणि सर्वांना रंगेहाथ पकडलंय.

या कारवाईमध्ये सध्या दोघी जणींवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तर आणखी एकाचा पोलिसांकडून शोध घेतला जातोय. हा वेश्या व्यवसहा तिघे जण मिळून चालवत असल्याचं सांगण्यात आलं.

रॉनी बच्चालाल भारती, अमित उर्फ प्रवीण बळीराम आसटकर आणि वैष्णवी उर्फ रोहिणी भोसले या तिघांविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला आहे.

त्यांच्याविरोधात 370, 3, 34 यासोबत अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम 1956चं कलम 4 आणि 5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. असं पोलिसांनी सांगितलं आहे.

दरम्यान, यापूर्वी देखील पिंपरी चिंचवड शहर आणि परिसरात पोलिसांकडून अश्या प्रकारच्या अनेक गुन्ह्यांच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.

सध्या पिंपरी चिंचवड शहर परिसर हा वेश्या व्यवसायाचा केंद्र बिंदू बनत चालला आहे. या भागात महिला मोठ्या प्रमाणावर वेश्या व्यवसायासाठी उभ्या असल्याचे सरास पहायला मिळत आहे.

त्यामुळे पोलिसांनी याला आळा घालण्याबाबत उपाययोजना करणे गरजेचे आहे. या संदर्भात स्थानीक पोलिसांशी संपर्क केला असता त्यांनी सध्या बोलण्यास नकार दिला आहे.