पिंपरी-चिंचवड – उन्हाच्या तडाख्यानं बेजार झालेल्यांना पावसाची प्रतिक्षा असते. सर्वजण पावसाची (rain) वाट बघत असतात. पावसाळा (rain) सर्वांना सुखावणारा असतो. सध्या राज्यतील अनेक भागांमध्ये पावसाची (rain) जोरदार बॅटिंग सुरु असून, जिल्ह्यांमध्ये तर पूरपरिस्थिती निर्माण झाली असल्याचे दिसून येत आहे. पुणे शहरात (pune) आणि इतर परिसरात देखील गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे.

तर दुसरीकडे राज्यात मुंबई, रायगड, कोल्हापूर, महाड मध्ये पावसानं थैमान घातलं आहे. दिवसभर राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसानं झोडपून काढलं आहे.

तर दुसरीकडे पिंपरी-चिंचवडकरांना (pimpri chinchwad) पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरण क्षेत्रात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडल्याने पाणी कपातीपासून काहीसा दिलासा मिळालाय,

गेल्या 24 तासात धरण क्षेत्रात 55 मिमी पाऊस झाला आहे. जो मागच्या वर्षीच्या तुलनेत खूपच कमी आहे, गेल्या वर्षी आजच्या तारखेपर्यंत 545 मिमी पावसाची नोंद झाली होती.

यावर्षी केवळ 392 मिमी पाऊस झालाय, पवना धरणात सध्या 19.45 टक्के पाणी साठा झाला आहे. पाऊस असाच राहिल्यास तो टक्का वाढणार आहे.

तूर्तास तरी पिंपरी-चिंचवडकरांवरील (pimpri chinchwad) पाणी कपातीच संकट टळलंय, अशी शक्यता वर्तवली जात आहे. पुणे जिल्ह्यातील अनेक लहान-मोठ्या गावांमध्ये पावसाने तुफान बॅटिंग गेली आहे.

चाकण, राजगुरूनगर, मंचर आणि नारायणगाव या भागांमध्ये (pune dist rain) देखील गेल्या दोन दिवसांपासून तुफान पाऊस पडत असून, बळीराजा सुखावला आहे.

असाच पाऊस चालू राहिला तर धरण क्षेत्राला देखील मोठ्या प्रमाणात याचा फायदा होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.