पिंपरी – तृतीयपंथीयांना (Third Gender) दरमहा पेंशन सुरू करून दुर्लक्षित असलेल्या समाज घटकाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) महापालिकेनं सामाजिक क्रांतीचं पाऊल उचललं आहे. अशी योजना करणारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका (Pimpri Chinchwad) देशातील पहिली ठरली आहे. या समूहाला (Third Gender Community) मुख्य प्रवाह आणून स्वावलंबी बनविण्यासाठी महापालिकेने विविध उपक्रम आणि योजना हाती घेतल्या आहे.

वयाची ५० वर्षे पूर्ण झालेल्या महापालिका हद्दीतील रहिवासी असणाऱ्या तृतीयपंथी (Third Gender) व्यक्तींना दरमहा ३ हजार रुपये पेंशन स्वरुपात देण्यात येणार आहे.

त्यांच्या जीवनामानावर दुरगामी सकारात्मक परिणाम करणारी ही तृतीयपंथी पेंशन योजना असल्याचे आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी सांगितले.

Advertisement

तसेच, महापालिकेच्या ग्रीन मार्शल पथकामध्ये तृतीयपंथीयांची नेमणूक देखील केली जाणार स्वच्छाग्रह अभियानात त्यांचा सहभाग वाढविला जाणार आहे.

तसेच त्यांना महापालिकेच्या उद्यानांमध्ये सुरक्षा रक्षकाची जबाबदारी दिली जाणार आहे.

महापालिकेच्या वतीने सुरु असलेल्या ३४ योजनांमध्ये सुधारणा करण्यात आली असून ७ योजना रद्द करण आल्या आहेत. तर ६ योजना नव्याने सुरु करण्यात आल्या आहेत.

Advertisement

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेनं या कल्याणकारी कामासाठी पुढाकार घेतला आहे.

महापालिकेनं या समूहाला मुख्य प्रवाहात आणून स्वावलंबी बनवण्यासाठी विविध उपक्रम आणि योजना हाती घेतल्या आहेत.

तृतीयपंथीयांना उतारवयात बऱ्याचदा हलाखीचं जीवन जगावं लागतं. अशावेळी त्यांना आर्थिकदृष्टया मदत करून त्यांचं जीवन सुसह्य करण्यासाठी महापालिकेने महत्वाकांक्षी योजना सुरू केली आहे.

Advertisement