पिंपरी-चिंचवड – पिंपरी-चिंचवड (pimpri chinchwad) शहरातील नागरिकांच्या सध्या पाण्यामुळे चांगलेच हाल होत असल्याचे दिसून येत आहे. शहरातील अनेक भागांत अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. ऐन दिवाळी सणापासून हा प्रकार होत असल्याने नागरिक रोष व्यक्त करीत आहे. त्यामुळे शहरात पाण्याबाबत तक्रारीत झाली आहे. दिवाळी दरम्यान पिंपरी-चिंचवड येथील रावेत परिसरातील जलवाहिनी (water) फुटल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला होता. जलवाहिनी फुटल्याने (water) शहरातील अर्धा भाग बाधित झाला होता.

तेव्हा पासून शहरातील हा गोंधळ सुरूच आहे. त्यामुळे नियमितपणे योग्य दाबाने पाणीपुरवठा (water) करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

दोन दिवसांतून एकदा पाणी येत असून, ते ही व्यवस्थितपणे पुरविले जात नाही. त्यामुळे नागरिकांची मोठी अडचण होत आहे. पाणी नसल्याने खासगी टँकरवाल्याकडून पाणी विकत घ्यावे लागत आहे.

त्यामुळे आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. ऐन सणासुदीत पाणीटंचाई निर्माण झाल्याबाबत चौकशी करून संबंधित अधिकारी व कर्मचार्‍यांवर कारवाई करावी, अशी तक्रार नागरिक करत आहेत.

अधिकारी फोनच उचलत नाहीत….

या संदर्भात ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे रामराव नवघन यांनी आयुक्त शेखर सिंह तसेच, सारथी हेल्पलाइनवर तक्रार केली आहे.

पाणीपुरवठा विभागाच्या हलगर्जीपणा व दुर्लक्षामुळे शहरातील नागरिकांना गेल्या चार दिवसांपासून व्यवस्थितपणे पाणीपुरवठा होत नाही.

पालिकेत प्रशासकीय राजवट असल्याने अधिकार्‍यांना संपर्क साधला असता, ते उडवाउडवीचे उत्तरे देत आहेत. वारंवार तक्रारी करूनह त्याकडे साफ दुर्लक्ष केले जात आहे. काही अधिकारी फोनच उचलत नाहीत.