पिंपरी चिंचवड – पिंपरी चिंचवड (pimpri chinchwad) येथील रावेत परिसरातील जलवाहिनी (water) फुटल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. ऐन सणासुदीच्या काळात हा प्रकार घडल्याने नागरिकांची चांगलीच फजिती झाल्याचं पाहायला मिळत आहे. रावेत येथे टप्पा 3 ला पाणीपुरवठा (water) करणाऱ्या 1400 मिलिमिटर व्यासाच्या जलवाहिनीला 26 ऑक्टोबर रोजी अचानक गळती सुरु झाली. त्यामुळे पाणीपुरवठ्याची यंत्रणा बंद ठेवावी लागली. मात्र, जलवाहिनी फुटल्याने (water) शहरातील अर्धा भाग बाधित झाला आहे.

त्यानंतर विभागाच्या टीमने जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम सुरू केले. परंतु, दुरुस्ती कामासाठी घेतलेल्या शटडाऊनमुळे पाणीपुरवठ्याची परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी मंगळवारची वाट पाहावी लागणार आहे.

त्यामुळे पुढील काही दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन करण्यात आले आहे.

जलवाहिनी फुटल्याने ‘हा’ भाग बाधित झाला…

जाधववाडी मधील रिव्हर रेसिडेन्सीपरिसर, ऐश्वर्यम हमारा सोसायटी , देहूआळंदी रोड परिसर,मधला पेठा, बोल्हाईमळा, शिवरस्त्यापर्यंत, त्रिवेणीनगर, आकुर्डी, संभाजीनगर, शाहूनगर, यमुनानगर, काळभोर नगर, विद्यानगर,

से.22, ओटा स्किम, रुपीनगर, तळवडे, जोतिबानगर व इतर भाग, कुदळवाडी महाराष्ट्र वजन काटा परिसर, जाधववाडी, कृष्णानगर, फुलेनगर, शिवतेजनगर, पूर्णानगर,

नेवाळेवस्ती, सुदर्शननगर, शरदनगर, कोयनानगर, केशवनगर,चिखली गावठाण,कुदळवाडी, पवारवस्ती, हरगुडेवस्ती अजंठानगर, चिखली परिसर, नेहरूनगर, उद्यमनगर, यशवंतनगर,

गवळीमाथा झोपडपट्टी, खराळवाडी, गांधीनगर, कामगारनगर, अजमेरा, मासुळकर कॉलनी, मोरवाडी, वास्तू उद्योग, लालटोपीनगर, महेशनगर, विठ्ठलनगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प हा भाग बाधित झाला.