पिंपरी चिंचवड – पिंपरी चिंचवड शहरात (Pimpri Chinchwad News) एक धक्कादायक घटना घडली आहे. 6 वर्षीय बालकावर ग्राइंडिंग मशीन पडल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हि घटना सांगवी परिसरात काल मंगळवारी (5 जून) दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली आहे. ही दुर्दैवी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात (CCTV Video) कैद झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे खेळता खेळता या चिमुरड्यानं आपल्या आईच्या डोळ्यांदेखत प्राण (Son died in front of his Mother) सोडला.

मिळालेल्या माहितीनुसार, 6 वर्षीय चिमुरडा आपल्या आई सोबत हा चिमुकला वॉशिंग सेंटरमध्ये आलेला होता. गाडी धुण्यासाठी आलेले आई आणि मुलगा शेजारीच असलेल्या फॅब्रिकेशनच्या दुकानात थांबलेले होते.

त्यावेळी त्याची आई दुकान मालकाशी बोलत असताना मुलगा ग्राइंडिंग मशीनच्या जवळ गेला आणि ग्राइंडिंग मशीन ला फिट केले नसल्याने ती मशीन त्याच्या अंगावर पडली.

Advertisement

क्षणात मुलाच्या डोक्यावर गंभीर जखम झाल्याने तो बेशुद्ध झाला. त्यानंतर तात्काळ मुलाला जवळील रुग्णालय नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले .

तिथे बसून ते गप्पा मारत होते. आई मुलाचा एकमेकांशी संवाद सुरु होता. त्याच वेळी मुलगा खेळण्याच्या इराद्याने शेजारी असलेल्या लोखंडी मशिनजवळ गेला. या मशिनशी खेळण्याचा प्रयत्न करत असतेवेळी दुर्दैवी घटना घडली.

सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये एकूण चार लोक दिसून आलेत. दोघे जण फॅब्रिकेशनचं काम करताना दिसत आहेत. तर आई एका बाकावर बसली आहे. तर मुलगाही तिच्यासोबत आहे.

Advertisement

मुलगा खाली बाकड्याशेजारी उभा आहे. आई आणि मुलगा यांचा एकमेकांशी संवाद सुरु आहेत. यात एका क्षणी मुलगी शेजारी असलेल्या एका मशिनसोबत खेळायला जातो.

ही मशिन जड असल्याचं भासल्यानंतर तो त्यावर आपलं वजन टाकतो. पण इतक्यात होत्याचं नव्हतं होतं (Son died in front of his Mother).

लोखंडी मशिन अंगावर पडल्यानं या सहा वर्षांच्या चिमुरड्याला इतका जबर मार बसतो, की त्यातच त्याचा मृत्यू होतो. अवघ्या काही क्षणांत मुलाच्या जाण्याने या मुलाच्या आईलाही जबर धक्का बसलाय.

Advertisement