पिंपरी-चिंचवड – पिंपरी-चिंचवड (pimpri-chinchwad) शहरातील 15 मिमी व्यासाचे घरगुती अनधिकृत नळजोड नियमित करण्यासाठी पिंपरी-चिंचवड (pimpri-chinchwad) महापालिकेने मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार अनधिकृत नळजोड (water supply) नियमित करण्याची मुदत 31 डिसेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पाणी पुरवठा विभागाकडून (water supply) करण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने अनधिकृत नळजोड (water supply) अधिकृत करण्यात येत आहेत. त्याची मुदत पाणी पुरवठा विभागाकडून 30 जूनवरून 31 ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली होती.

यामध्ये नागरिकांना 15 मिमी व्यासाची घरगुती अनधिकृत जळजोड अधिकृत करण्याची संधी देण्यात आली होती. परंतु, नागरिकांचा अपेक्षीत प्रतिसाद मिळत नसल्यामुळे या मोहिमेला पाणी पुरवठा विभागाकडून दोनवेळा मुदतवाढ देण्यात आली.

अनधिकृत नळजोड नियमित करण्यासाठी आता 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानंतर पालिकेकडून नळजोडांवर कारवाई करण्यात येणार आहे.

त्यामुळे अनधिकृत नळजोड नियमित करण्यासाठी विहित अर्जासोबत आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसेन्स, पॅन कार्ड, मनपाचे मिळकतकर आकारणी बिल आणि लाइट बिलाच्या साक्षांकित प्रती जोडणे बंधनकारक आहे.

अर्ज जवळच्या नागरी सुविधा केंद्रात जमा करावेत, किंवा संबंधित क्षेत्रीय कार्यालयातील पाणी पुरवठा विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून करण्यात आले आहे.

दरम्यान, अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रिय कार्यालयातील पाणीपुरवठा विभागाशी संपर्क साधायचा आहे. एक जानेवारीपासून अनधिकृत नळजोड तोडण्याची व असे नळजोड घेतलेल्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची कारवाई केली जाणार आहे.

शहरात मोठ्या संख्येने अनधिकृत निवासी तसेच, बिगरनिवासी नळजोड आहेत. त्यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात चोरी व गळती होते. त्यामुळे शहरात अपुर्‍या प्रमाणात उपलब्ध होणार्‍या पाण्यासंदर्भात वारंवार तक्रारी केल्या जात आहेत.

त्या तक्रारींची दखल घेत पाणीपुरवठा विभागाने कारवाई मोहीम हाती घेतली आहे. अनधिकृत नळजोड खंडित करण्यात येत आहेत. तसेच, थेट नळास लावलेले विद्युत मीटर पंप जप्त करण्यात येत आहेत.