पिंपरी-चिंचवड – पिंपरी-चिंचवड (pimpri-chinchwad) शहराच्या लोकसंख्या वाढीचा दर, विकासाचा वेग आणि भविष्यातील शहराची लोकसंख्या विचारात घेता शहरामध्ये नियमित व उच्च दाबाने पाणीपुरवठा (water supply) करण्यासाठी महापालिका सातत्याने प्रयत्नशील आहे. आणि याच पार्श्ववभूमीवर शुक्रवार ११ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी १० वाजेपासून मुख्य जलवाहिनीला (water supply) उपवाहिन्या जोडणीचे काम करण्यात आहे. पाईप जोडणीचे (water supply) काम अंदाजे सायंकाळी ७ पर्यंत चालू होते.

यामुळे महापालिकेच्या क, इ आणि फ प्रभागातील जाधववाडी, बोऱ्हाडेवाडी, मोशी, डूडुळगाव, चऱ्होली, वडमुखवाडी, चोवीसावाडी, पांजरपोळ, सेक्टर १२ यांसह इंद्रायणीनगरच्या काही भागात सकाळी 10 ते रात्री 7 वाजेपर्यंत पाणीपुरवठा (water supply) बंद होता.

त्यानंतर रात्रीचा व दुसऱ्या दिवशी सकाळचा पाणीपुरवठा उशिरा, कमी दाबाने व विस्कळीत राहील. असं सांगण्यात आलं होत. मात्र, अद्याप ही पिंपरी-चिंचवड (pimpri-chinchwad) शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत असल्याचं पाहायला मिळत आहे.

त्यामुळे शहरवासीयांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. पाणीपुरवठा विभागाचा नियोजनशून्य कारभार या परिस्थितीला जबाबदार असल्याची तक्रार नागरिक तसेच लोकप्रतिनिधींकडून करण्यात येत आहे.

पालिकेच्या क, इ आणि फ क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील जाधववाडी, बोऱ्हाडेवाडी, मोशी, डुडूळगाव, चऱ्होली, वडमुखवाडी, चोवीसावाडी, पांजरपोळ, सेक्टर १२, इंद्रायणीनगर आदी भागांतील पाणीपुरवठा शुक्रवारी पूर्णपणे विस्कळीत झाला होता.

मुख्य जलवाहिनीला उपवाहिन्या जोडणीचे काम सुरू केल्याचे कारण देण्यात आले होते. उशिरापर्यंत ते काम पूर्ण होऊ शकले नव्हते. दुसऱ्या दिवशी कमी दाबाने पाणी होईल, असे पालिकेकडून सांगण्यात आले.

दुसऱ्या दिवशीही पाणीपुरवठा सुरळीत होऊ शकला नाही. तिसऱ्या दिवशी फ क्षेत्रीय कार्यालय हद्दीत प्रभाग क्रमांक ११, १२, १३ येथील पाणीपुरवठा विस्कळीत झाला. जलवाहिन्यांमध्ये अचानक गळती सुरू झाल्याचे कारण तेव्हा देण्यात आले.

त्याचा परिणाम दोन दिवसांपासून या भागात पाण्यावाचून नागरिकांची गैरसोय झाली. काही दिवसांपासून शहरातील कोणत्या ना कोणत्या भागात पाण्याची तीव्र समस्या भेडसावत आहे. त्यामुळे नागरिक चांगलेच हैराण झालंच पाहायला मिळालं.