पिंपरी चिंचवड – ऐन दिवाळीच्या (Diwali) तोंडावर पिंपरी चिंचवड (pimpri chinhwad) शहरात विजेचा (electricity) लपंडाव सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. सध्या सगळीकडे दिवाळीचा मोठा उत्साह दिसून येत आहे. आणि अश्यातच शहरातील काही भागांमध्ये लाईट (electricity) नसल्याने महिला भगिनी व व्यापारी त्रस्त झाले आहेत. त्यामुळे वीज वितरण कंपनी आपल्या ग्राहकांना दिवाळी नीट खाऊ देणार की नाही, असा प्रश्न उपथित होत केला जात आहे.

शहरातील (pimpri chinhwad) स्थानिक नागरिक आपल्या कुटुंबांसह दिवाळी साजरी करत आहे. महिलावर्ग देखील दिवाळीचे पदार्थ करण्यात व्यस्त असताना गेल्या काही दिवसांपासून सातत्याने विजेचा (electricity) लपंडाव सुरू झाला आहे. विजेची ये-जा सुरू असल्यामुळे शहरातील नळ पाणीपुरवठा ठप्प झाला आहे.

गिरण्याही दिवाळीत बंद ठेवाव्या लागत आहेत. विजेच्या लपंडावामुळे पथदिवे बंद पडत असल्यामुळे रस्ते सुद्धा रात्रीच्या अंधारात लुप्त होऊन जात आहे. आणि याचा सामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

सांगवी, पिंपळे गुरव भागात बुधवारी वीजपुरवठा खंडित झाला होता. आकुर्डी भागातही पहाटे साडेपाच वाजता खंडित झालेला वीजपुरवठा सकाळी दहाला सुुरळीत झाला. त्याचप्रमाणे पिंपळे गुरव भागातही वीज गायब होती.

सतत पडत असलेला पाऊस, विजांचा कडकडाट, वादळ, महापालिकेकडून विविध कारणांसाठी केल्या जाणार्‍या खोदकामात केबल तुटणे, अतिलोड आल्याने ट्रान्सफॉर्मर खराब झाल्यामुळे वीजपुरवठा खंडित होत असल्याचे महावितरणकडून सांगण्यात येत आहे.

दरम्यान, या सर्व घटनेवर अभियंता वीज वितरण अधिकारी दत्तात्रय साळी यांनी देखील आपले मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, “दिवाळीत वीजपुरवठा खंडित होऊ नये, यासाठी वीज वितरणच्या कर्मचार्‍यांना अलर्ट करण्यात आले आहे.

वीजपुरवठा खंडित होणार नाही, याची काळजी घेण्यात येत आहे. शहरात अनेक ठिकाणी दुरुस्तीची कामे करण्यात आली आहेत. मात्र, मोठ्या प्रमाणात परतीचा पाऊस तसेच विविध कारणांसाठी होणार्‍या खोदकामामुळे काही प्रमाणात तक्रारी येऊ शकतात. असं ते म्हणाले.