पिंपरी-चिंचवड – जगभरात गेल्या दोन वर्षापासून करोनाने (corona) अक्षरशः थैमान घातला होता. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात करोना विषाणूचा प्रादुर्भाव (Corona Update) कमी झाल्याचं चित्र पाहायला मिळत असतानाच आता, पुन्हा एकदा करोना विषाणूननं आपलं डोक वर काढलं आहे. राज्यात करोनाचा (Corona Update) विषाणूचा प्रसार दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.

रुग्णांमध्ये देखील झपाट्याने होत असून, संभाव्य चौथ्या लाटेची चिंता व्यक्त केली आहे. पिंपरी-चिंचवड (pimpri chinchwad) शहरातील करोनाच्या रुग्णसंख्येतील वाढ सुरुच आहे.

नुकतीच, पिंपरी-चिंचवड शहराच्या (Pimpri Corona Update) विविध भागातील नवीन करोना रुग्णांची (मंगळवार) नोंद झाली आहे. तर, करोनामुळे महापालिका हद्दीतील एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही.

आजपर्यंत शहरातील 4 हजार 630 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला. (Pimpri Corona Update) शहरातील 3 लाख 72 हजार 544 जणांना आजपर्यंत करोनाची लागण झाली. सध्या 78 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 78 ही रुग्ण गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत.

तर, महापालिका रुग्णालयामध्ये अद्याप एकही रुग्ण दाखल नाही. (Pimpri Corona Update) तसेच, दिवसभरात 54 नागरिकांचे लसीकरण झाले. आजपर्यंत 37 लाख 87 हजार 920 जणांनी करोना प्रतिबंधक लस घेतली.

तसेच, आरोग्य विभागाने सुद्धा काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. करोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून, नागरिकांची सुद्धा डोकेदुखी वाढली आहे.

नवीन विषाणूचा सामना करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे जारी :

1. तापासारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

2. लवकरात लवकर वैद्यकीय सल्ला घ्या.

3. सार्वजनिक ठिकाणी करोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून वावरा.

4. भारत सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार लसीकरण.

5. अगोदरच आजारी असलेल्यांनी सार्वजनिक ठिकाणी जाताना अधिक खबरदारी घेणे

6. इन्फ्लूएंझा सारख्या आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तींनी शक्यतो सार्वजनिक संपर्क टाळावा.