पुणे – जगभरात गेल्या दोन वर्षापासून करोनाने (corona) अक्षरशः थैमान घातला होता. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात करोना विषाणूचा प्रादुर्भाव (Corona Update) कमी झाल्याचं चित्र पाहायला मिळत असतानाच आता, पुन्हा एकदा करोना विषाणूननं आपलं डोक वर काढलं आहे. राज्यात करोनाचा (Corona Update) विषाणूचा प्रसार दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.

सणासुदीसोबतच देशात करोना महामारीची लाट पुन्हा येण्याचा धोकाही वर्तवला जात आहे. दुसरी लाटही अशीच सणासुदीच्या (diwali) काळातच आली होती. सध्या रुग्णांमध्ये देखील चढ-उतार होत असून, संभाव्य चौथ्या लाटेची चिंता व्यक्त केली आहे.

त्यामुळे आरोग्य विभागाने सुद्धा काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. पिंपरी-चिंचवड (pimpri chinchwad) शहराच्या विविध भागातील 26 नवीन करोना बाधित रुग्णांची आज नोंद झाली. तर, करोनामुक्त झालेल्या 20 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

करोनामुळे महापालिका (pimpri chinchwad) हद्दीतील एकाही रुग्णाचा काल मृत्यू झाला नाही. आजपर्यंत शहरातील 4 हजार 629 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला होता.

तर, शहरातील 3 लाख 72 हजार 256 जणांना आजपर्यंत करोनाची लागण झाली. सध्या 98 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 91 रुग्ण गृहविलगीकरणात उपचार घेत आहेत.

7 रुग्ण महापालिका रुग्णालयामध्ये दाखल आहेत. (Pimpri Corona Update) आज दिवसभरात 27 नागरिकांचे लसीकरण झाले. आजपर्यंत 37 लाख 85 हजार 308 जणांनी करोना प्रतिबंधक लस घेतली.

नवीन विषाणूचा सामना करण्यासाठी मार्गदर्शक तत्वे जारी :

1. तापासारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

2. लवकरात लवकर वैद्यकीय सल्ला घ्या.

3. सार्वजनिक ठिकाणी करोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करून वावरा.

4. भारत सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार लसीकरण.

5. अगोदरच आजारी असलेल्यांनी सार्वजनिक ठिकाणी जाताना अधिक खबरदारी घेणे

6. इन्फ्लूएंझा सारख्या आजाराने ग्रस्त असलेल्या व्यक्तींनी शक्यतो सार्वजनिक संपर्क टाळावा.