पुणे : शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. १ जानेवारीला (१ January) पंतप्रधान किसान सम्मान निधी योजनेचा (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi) दहावा हफ्ता लवकरच खात्यात जमा होणार आहे.

पण हे पैसे जमा होण्यासाठी शेतकऱ्यांना (Farmer) एक गोष्ट करणे बंधनकारक असणार आहे. त्याशिवाय शेतकऱ्यांच्या खात्यात (Farmer Bank Account) पैसे जमा होणार नाहीत. शेतकऱ्यांना आता ई-केवायसी करणे बंधनकारक असणार आहे.

ई-केवायसी (E-KYC) केल्यानंतरच शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येणार आहेत. बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनसाठी (Biometric authentication) ​जवळच्या सीएससी केंद्रांमध्ये (CSC centers) जाऊन शेतकऱ्यांना ही प्रक्रिया करावी लागणार आहे.

Advertisement

कशी कराल ई-केवायसी

१ पहिल्यांदा पीएम किसान योजनेच्या https://pmkisan.gov.in/ या अधिकृत वेबसाइटवर जा.
२ उजव्या हाताला, होमपेजमध्ये खालील बाजूला, तुम्हाला फार्मर्स कॉर्नर दिसेल.

३ तिथे फार्मर्स कॉर्नरच्या अगदी खाली एक बॉक्स आहे, तिथे ई-केवायसी म्हटले आहे.
४ ई-केवायसीवर क्लिक करा.
५ त्यानंतर आधार ईकेवायीसची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी एक पेज ओपन होईल.

Advertisement

६ आता तुम्ही त्यात तुमचा आधार क्रमांक भरा आणि त्यानंतर कॅप्चा कोड भरा आणि त्यानंतर सर्च बटनावर क्लिक करा.
७ यानंतर तुम्हाला तुमच्या आधारशी लिंक केलेला मोबाइल नंबर टाकावा लागेल. त्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला ओटीपी येईल.
८ हा ओटीपी तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर येईल.

९ तो ओटीपी भरा आणि ऑथेंटिकेशनसाठी सब्मिट बटणावर क्लिक करा.
१० तुम्ही ऑथेंटिकेशनसाठी सब्मिट बटणावर क्लिक केल्याबरोबर तुमची पीएम किसान योजनेसाठी ई-केवायसी प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण होईल.

Advertisement