पुणे – प्रधानमंत्री किसान सन्मान (PM Kisan Samman Nidhi) निधी योजनेअंतर्गत देशभरातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या (farmers) खात्यात आर्थिक मदत केली जाते. पीएम सन्मान निधी योजनेचे (PM Kisan Yojana) 11 हप्ते शेतकऱ्यांच्या (farmers) खात्यात वर्ग करण्यात आले आहेत. हा हप्ता 31 मे रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवण्यात आला. शेतकरी आता बाराव्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.

ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात कोणत्याही तारखेला 12 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात येऊ शकतो, अशी माहिती आहे. वास्तविक, पीएम किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये दिले जातात.

हे पैसे दर 4 महिन्यांनी 2-2 हजार रुपयांच्या हप्त्याच्या स्वरूपात दिले जातात. शेवटचा म्हणजे 11 वा हप्ता केंद्र सरकारने 31 मे रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केला होता.

Advertisement

त्यावेळी दहा कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यात आले होते. जरी सर्व लाभार्थी 12 व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत, परंतु ज्यांचे ई-केवायसी झाले नाही त्यांचे हप्त्याचे पैसे अडकले जाऊ शकतात.

ते पूर्ण करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2022 होती. अशा परिस्थितीत ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी केलेले नाही, त्यांना पुढील हप्ता मिळणे कठीण होऊ शकते.

अनेक दिवसांपासून पंतप्रधान किसान योजनेचा (PM Kisan Yojana) बेकायदेशीरपणे फायदा घेत असल्याची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. हे करणार्‍यांवर सरकार कडक झाले आहे.

Advertisement

अशा लोकांना पैसे परत करण्यासाठी नोटीस पाठवली जात आहे. तत्काळ पैसे परत न केल्याने या लोकांवरही कारवाई होऊ शकते, असे सांगण्यात आले.