प्रधानमंत्री किसान (PM Kissan) योजनेअंतर्गत देशभरात करोडो शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपये येतात. हे पैसे ३ टप्प्यामध्ये दोन दोन हजार रुपये मध्ये ४ महिन्याच्या अंतरावर येतात. आत्तापर्यंत याचे १० हफ्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर (Bank Account) जमा झाले आहेत.

देशातील शेतकऱ्यांना वेगवेगळ्या अडचणींना सामोरे जावे लागते. अनेक वेळा शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान होत असते. त्यामुळे शेतकरी हा कर्जामध्ये बुडला जातो.

त्यामुळे शेतकऱ्यांचा हेतू लक्षात घेता सरकारने वेगवेगळ्या योजना राबवल्या आहेत. त्यामध्येच प्रधानमंत्री किसान सन्मान योजना (Pradhan Mantri Kisan Sanman Yojana) आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना वार्षिक ६ हजार रुपये मिळतात.

Advertisement

जानेवारीमध्ये या योजनेचा १०वा हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला असून एप्रिल महिन्यामध्ये ११वा हफ्ता जमा होणार आहे. त्यामुळे सरकारने यापुढील रकमेचा लाभ घेण्यासाठी e-KYC करणे बंधनकारक असल्याचे सांगितले आहे.

e-KYC का करावी?

देशामध्ये अनेक ठिकाणी फसवणुकीचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे अशा प्रकरणापासून वाचण्यासाठी e-KYC करणे गरजेचे आहे.

Advertisement

तसेच e-KYC केली नाही तर एप्रिल महिन्यात येणारा हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार नाही. तसेच यामध्ये चुकीची माहिती देणाऱ्या शेतकऱ्याच्या खात्यात देखील पुढील रक्कम जमा होणार नाही.

तसेच यापूर्वी जमा झालेले हफ्ते देखील परत करण्याची मागणी सरकारकडून करण्यात येणार आहे. त्यामुळे चुकीची माहिती देऊन रजीस्ट्रेशन करू नये असे सांगण्यात आले आहे.

Advertisement