मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांची शस्त्रक्रिया (Surgery) झाल्यामुळे गेली काही दिवस ते कामावर आलेले नाहीत. त्यावरून त्यांच्या विरोधी पक्षाकडून जोरदार टीका करण्यात आली होती.

अशातच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधानांनी बोलावलेल्या बैठकीसाठी (PM Meeting) गैरहजर राहणार आहेत. त्यांच्याजागी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी वाध्य कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अनेक राज्यातील मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार नाहीत.

Advertisement

पंतप्रधानांच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री उपस्थित राहणार नसल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून (Chief Minister’s Office) देण्यात आली आहे.. तसेच राजेश टोपे हे या बैठकीसाठी जाणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

मुख्यमंत्री कोणत्या कारणासाठी पंतप्रधानांच्या बैठकीसाठी उपस्थित राहणार नाहीत याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आली नाही.

आरोग्यमंत्री राजेश टोपे या बैठकीत लसीचा पुरवठा आणि औषधाबाबत मागणी करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच निर्बंधाबाबत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Advertisement