दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी राज्यसभेत (Rajyasabha) जोरदार भाषण केले यामध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचे कौतुक करत काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Congress leader Rahul Gandhi) यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यांनी या भाषणात काँग्रेसचा चांगलाच समाचार घेतला आहे.

नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत भाषण केले होते. या वेळी त्यांनी शरद पवार या वयात आजारी असूनही पक्ष व सामान्य माणसांच्या अडचणींसाठी नेहमी धरपड करत असतात. त्यांच्याकडून राहुल गांधी यांनी काहीतरी शिकले पाहिजे. असे मोदींनी त्यांच्या भाषणात म्हटले आहे.

त्याचसोबत गुजरातमध्ये (Gujrat) एक गोष्ट बोलली जाते तीच गोष्ट महाराष्ट्रातही (Maharashatra) बोलली जात असेल. कदाचित शरद पवारांना माहीत असेल.

Advertisement

जेव्हा हिरवळ असते, शेत-शिवार हिरवगार झालेले असते आणि कुणी जर ती हिरवळ पाहिली असेल तर त्याच वेळी अपघात होऊन त्याचे डोळे गेले तर आयुष्यभर त्याला तो हिरवे चित्रं दिसत असते.

तसेच २०१३ पर्यंत दुर्दशेत दिवस काढले. २०१४ मध्ये लोकांच्या आशीर्वादाने कुणाची दृष्टी गेली असेल तर त्यांना ते जुने दिवसच दिसणार अशी खोचक शब्दात टीका त्यांनी राहुल गांधी यांच्यावर केली.

या भाषणात मोदींनी तीन वेळा शरद पवार यांचे नाव घेत कौतुक केले आणि राहुल गांधी यांनी पराजयाचा सामना करायला हवा, नाहीतर पक्षासोबत पक्षाअंतर्गत व्यक्तीही नाराज होतील असा खोचक सल्लाही त्यांनी यावेळी राहुल गांधी यांना दिला आहे.

Advertisement