नवी दिल्ली – आज 15 ऑगस्ट 2022, भारताला स्वातंत्र्य मिळून आज 75 वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमित्तानं देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव (Azadi Ka Amrit Mahotsav) साजरा केला जात आहे. राजधानी दिल्लीत लाल किल्ल्यावर यंदा 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त (Independence Day 2022) खास तयारी करण्यात आली आहे. तर, नुकतंच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करण्यात आलं आहे. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली. यावर्षी पहिल्यांदाच स्वदेशी 21 तोफांची सलामी देण्यात आली आहे.

तसेच लाल किल्ल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) जनतेला संबोधित देखील केलं असून, त्याकडे सर्व जनतेचं लक्ष लागलं होते. यंदाच्या स्वातंत्र्य दिनाची थीम ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ आहे.

दरम्यान, सध्या लाल किल्ल्यात आणि आजूबाजूला मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्यापूर्वी दहशतवादी हल्ल्याचा धोका लक्षात घेऊन कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.

आजच्या भाषणात पंतप्रधान मोदींनी विरोधकांना डिवचल असल्याचं दिसून आलं आहे. देशात अनेक गंभीर समस्या आहेत. पण त्यातील दोघांवर मी भाष्य करणार आहे, असं म्हणत मोदींनी विरोधकांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.

यावेळी मोदी म्हणाले, “देशात भ्रष्टाचार आणि घराणेशाही या दोन समस्यांनी ग्रासलंय’, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.

याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देशाला विकसीत करण्यासाठी या दोन समस्यांना सगळ्यात आधी तोंड द्यावं लागेल, असं सूचित केलं.

दरम्यान, जोपर्यंत भ्रष्टाचाराप्रती घृणा आणि द्वेष प्रत्येक भारतीयाचा मनात निर्माण होत नाही, तो पर्यंत भ्रष्टाचाराची मानसिकता संपवणं कठीण आहे, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.

त्यामुळे प्रत्येक नागरिकाच्या मनात भ्रष्टाचाराविषयी (Corruption in India) द्वेष निर्माण होण्याची गरज असल्याचंही ते म्हणाले.

घराणेशाहीवर मोदींचा निशाणा! पहा काय म्हणाले….

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी “काका-पुतण्या आणि कौटुंबिक राजकारणाच्या मानसिकतेविरोधात लढा देण्याची गरज व्यक्त केली. घराणेशाहीविरोधात मी जेव्हा बोलतो तेव्हा लोकांना वाटतं की फक्त राजकीय विधानं करतो आहेत.

पण तसं नसून घराणेशाहीच्या आणि काका-पुतण्याच्या राजकारणामुळे देशाचं नुकसान होत आहे.” असं म्हणत मोदींनी विरोधकांना डिवचलंय.