पुणे – राज्यात सध्या नोकरभरती करणारी पुणे ही एकमेव महानगरपालिका (pmc recruitment) ठरली आहे. महापालिकेने नुकतीच ४४८ जागांची भरती (pmc recruitment) यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. त्यानंतर लगेचच २०० जागांसाठीची पुढील भरतीची प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त तथा प्रशासक विक्रमकुमार यांनी दिली. याशिवाय अग्निशमन विभागातील जवानांचीही स्वतंत्र भरती; तसेच ‘इंजिनीअर केडर’मध्येही वाढ करण्यात येणार आहे.

महापालिकेने २० जुलैपासून ४४८ जागांची भरती प्रक्रिया सुरू केली होती. त्यामध्ये सहायक विधी अधिकारी, लिपिक टंकलेखक, कनिष्ठ अभियंता आणि अतिक्रमण निरीक्षक या पदांसाठी ही भरती करण्यात आली.

दरम्यान, भरतीची प्रक्रिया पारदर्शी असावी अशी पालिकेची इच्छा आहे. मात्र, असे असून देखील या भरती मध्ये अनेक गैरप्रकार घडल्याचं पाहायला मिळालं आहे.

लिपिकपद वगळता इतर सर्व पदांच्या ऑनलाइन परीक्षेचे निकाल जाहीर होऊन कागदपत्र पडताळणी सुरू झाली आहे. पण ही कागदपत्र पडताळणी करताना अनुभव प्रमाणपत्राचा जुगाड करून बनावट अनुभव पत्र देण्याबाबत अनेक तक्रारी महापालिकेकडे येत आहेत.

त्यामुळे आतापर्यंत पारदर्शक झालेली भरती प्रक्रिया पुढील टप्‍प्यात प्रशासनाची डोकेदुखी वाढवणारी ठरण्याची शक्यता आहे. प्रशासनाकडे याबाबत तक्रारी आल्याने खोलवर जाऊन कागदपत्रांची पडताळणी करण्याची भूमिका घेतली आहे.

त्यामुळे आता अनेकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. पुणे महापालिकेत (pmc recruitment) तब्बल १० वर्षांनंतर पदभरती होत आहे. या भरतीसाठी ‘आयपीबीएस’ या संस्थेमार्फत ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली.

पुणे महापालिकेत गेल्या अनेक वर्षांहून अधिक काळ पदभरती (pmc recruitment) झाली नव्हती. पुणे महापालिकेने (pmc recruitment) बऱ्याच वर्षांनी सुमारे साडेचारशे पदांची भरती केली.

अपुऱ्या मनुष्यबळावर कारभार सुरू असल्याने त्याचा परिणाम कामकाजावर होतो, हे लक्षात आल्यानंतर ही भरती सुरु करण्यात आली आहे.

अशी होणार भरती :

१३५ – स्थापत्य शाखा अभियंता

५ – यांत्रिकी शाखा अभियंता

४ – वाहतूक नियोजन अभियंता

१०० – सहायक अतिक्रमण निरीक्षक

२०० – लिपिक

४ – सहायक विधी अधिकारी

८६, ९९४ – ऑनलाइन परीक्षा अर्ज

६७, २५४ – परीक्षा दिलेले उमेदवार