file photo

पुणेः शहरानजीक वाढणारे नागरिकीकरण आणि जनतेच्या वाढत्या अपेक्षा लक्षात घेऊन पिरंगुट, खारावडे, मुठागाव, दारवली या मार्गांवर येत्या उद्या (ता. २३) पासून बससेवा सुरू होणार आहे.

दोन दिवसांपूर्वी या मार्गांवर सुरू झाली बससेवा

(मार्ग क्र. २९६) कात्रज ते विंझरमार्गे नसरापूर, आंबवणे, (६५ अ) हडपसर ते वरवंडमार्गे यवत, चौफुला, (मार्ग क्र. २११) हडपसर- सासवड ते उरुळी कांचनमार्गे शिंदवणे घाट, (१९० ब) हडपसर ते वडकीगाव मार्गे फुरसुंगी,

(७४) घोटावडे फाटा ते हिंजवडी फेजवन १ मार्गे रिहेफाटा, (२२८) कात्रज ते वडगाव मावळ मार्गे कात्रज बायपास या मार्गांवर २० जूनपासून बससेवा सुरू झाली आहे. सुमारे ३५ मिनिटे ते दीड तास या अंतराने बस प्रवाशांना उपलब्ध होईल.

Advertisement

मंचरपर्यंत बससेवा सुरू होणार

(२२७ अ) मार्केटयार्ड ते लव्हार्डे गावमार्गे पिरंगुट, खारावडे, (८४) डेक्कन ते मुठागावमार्गे वारजे माळवाडी, (८६) पुणे स्टेशन ते पौडगाव मार्गे पिरंगुट, दारवली या मार्गांवर बुधवारपासून बससेवा सुरू होणार आहे.

तसेच भोसरी ते मंचरमार्गे चाकण, राजगुरुनगर या मार्गावर बससेवा सुरू करण्याबाबत सर्वेक्षण आणि नियोजनाचे काम सुरू आहे, अशी माहिती पीएमपी प्रशासनाने दिली.

नऱ्हे, सिंहगड रस्त्यासाठी नवे मार्ग

पीएमपीकडून बसमार्ग क्रमांक १३० स्वारगेट ते नऱ्हेगाव शर्विल सोसायटीमार्गे कात्रज आणि बसमार्ग क्रमांक ११७ स्वारगेट ते धायरी शर्विल सोसायटीमार्गे सिंहगड रोड, असे दोन मार्ग प्रवाशांच्या सोयीसाठी पुढील आठवड्यात सुरू करण्याचे नियोजन आहे.

Advertisement