ahmednagarlive24
Breaking News Updates Of Ahmednagar

पीएमपी डेपोच्या जागा करणार विकसीत

पुणे महानगर परिवहन लि. सातत्यानं बदलत आहे. कात टाकून ती नवे रुप धारण करते. आताही पीएमपीने आगाराच्या जागा विकसीत करण्याचा निर्णय घेतला आहे.

तीस डेपोचे रुप बदललणार

पीएमपीचे ३० डेपोचे रूप पालटणार आहे. कारण पीएमपी प्रशासनाने आपल्या डेपोच्या जागा विकसित करण्याचे ठरविले आहे. तसा प्रस्तावदेखील तयार असून येणाऱ्या मंडळाच्या बैठकीत यावर चर्चा होऊन सकारात्मक निर्णय घेतला जाईल.

डेपो विकसित करताना खाली बसेसचे पार्किंगसह कार्यशाळा राहील. इमारतीच्या वरच्या बाजूस मात्र हॉस्पिटल, हॉटेल, कार्यालय आदी असणार आहे. यासाठी ११ हजार ६६६ कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

जागेनुसार सुविधा

पुण्यातील व्ही. के. असोसिएशट मागील सहा महिन्यांपासून पीएमपीच्या डेपो विकसीत करण्यासंदर्भात अभ्यास करीत आहे. त्यांनी सादर केलेल्या प्रस्तावात पीएमपी डेपोचे ठिकाणानुसार तिथे काय करणे अधिक उचित ठरेल हे मांडले आहे.

त्यानुसार डेपो कोणत्या भागात आहे, त्यानुसार त्या ठिकाणी कोणती सुविधा देणे हे ठरविण्यात आले आहे. पीएमपीचे १३ डेपो आहेत, तर ४ इलेक्ट्रिक बससाठी प्रस्तावित आहेत. उर्वरित १३ डेपोसाठी पीएमपीची मोकळी जागा उपलब्ध आहे.

वर्षाला १५१६ कोटी मिळण्याची अपेक्षा

पीएमपी आपल्या जागेत वाणिज्य इमारत बांधून ती भाड्याने देईल. यात मोठे हॉस्पिटल, आयटी कार्यालय, हॉटेल्स आदीचा समावेश असेल. त्यातून पीएमपीला वर्षाकाठी किमान १५१६ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळेल, असा निष्कर्ष संबंधित कंपनीने काढला आहे.

दोन पर्यायांचा विचार सुरू

पीएमपीची आर्थिक स्थिती सध्या नाजूक आहे. अशा परिस्थितीत डेपो विकसीत करण्यासाठी पीएमपी स्वतः खर्च करणार नाही.

तसेच बँकांकडून कर्जदेखील काढणार नाही. त्यामुळे पीपीपी मॉडेलनुसार डेपो विकसित करणे अथवा जागा भाड्याने देणे या दोन पर्यायांचा विचार पीएमपी करीत आहे.

You might also like
2 li