Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

२३ गावांत पीएमपीएलची वाहतूक सुरू होणार

पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या 23 गावांत वाहतूक सुरू करण्याबरोबरच बस थांबे, आगारे निश्चित करण्याची प्रक्रिया पीएमपीएमएलने सुरू केली आहे. त्याबाबतचा आराखडा तयार करून लवकरच तो महापालिकेत सादर करण्यात येणार आहे.

नव्याने समाविष्ट 23 गावांपैकी 16 गावांत पीएमपीची वाहतूक सध्या सुरू आहे; मात्र उर्वरित गावांतील वाहतूक सुरू करण्याबाबत आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे.

तीन ठिकाणी पीएमपी आगारांची गरज

23 गावांपैकी किमान तीन ठिकाणी पीएमपीची आगारे उभारण्याची गरज आहे. बस थांबे, आगारे, पास केंद्र यांच्या जागांसाठी पीएमपीएमएल पहिल्या टप्प्यात आराखडा तयार करेल. त्यानंतर महापालिकेशी संपर्क साधून पीएमपीएमएलसाठी काही जागांचे आरक्षण निश्चित करण्यास सांगितले जाईल.

पुणे शहर राष्ट्रवादीतर्फे पुढाकार

दरम्यान, ही 23 गावं महापालिका हद्दीत आल्याने तिथल्या जिल्हा परिषद, पंचायत समित्यांतील पदेही संपुष्टात आली आहेत. म्हणजेच, या गावातील लोकप्रतिनिधी आता नव्याने पुणे महानगरपालिकेतील सदस्य असणार आहेत.

पुणे महापालिका निवडणुकीसाठी कालावधी असल्याने आणि विद्यमान लोकप्रतिनिधींची पदे संपुष्टात आल्याने येथे प्रशासकीय पातळीवर समन्वयाचा अभाव निर्माण होणार होता.

त्या पार्श्वभूमीवर पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे पुढाकार घेत, या गावांमध्ये समन्वय करण्यासाठी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडे जबाबदारी सोपवली आहे .

Leave a comment