पंतप्रधान यांचा १८ जानेवारी रोजीचा संभाव्य पुणे दौरा रद्द झाला आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून हा दौरा रद्द झाल्याची माहिती शुक्रवारी पुणे प्रशासनाला देण्यात आली.

पुणे(Pune) महाराष्ट्रासह देशभरात करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हा दौरा रद्द झाल्याचे सांगण्यात येत आहे( PM Narendra Modi) पुणे मेट्रोचे उद्घाटन,

महापालिकेच्या इमारतीतील छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण, दिवंगत ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर. के लक्ष्मण यांच्या नावाने असलेल्या

Advertisement

कलादालनाचे उद्घाटन; तसेच सिम्बायोसिस विद्यापाठीशी संबंधित कार्यक्रमांना पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधीत करणार होते.

पंतप्रधान यांचा १८ जानेवारी रोजीचा संभाव्य पुणे दौरा नाही अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून विभागीय आयुक्त कार्यालयाला कळविण्यात आली.

Advertisement