जेजुरी पोलिसांनी अवैध दारू भट्ट्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. शेतकऱ्यांना आपल्या शेतात आणि आजूबाजूच्या परिसरात अशा भट्ट्या आढळून येत आहेत. अशाच दोन दारूभट्ट्यांवर पोलिसांनी कारवाई केली. पोकलेनद्वारे भट्या उद्ध्वस्त करण्यात आल्या.

रसायने नष्ट

जेजुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भोसलेवाडी आणि राजवाडी परिसरातील अवैध दारू भट्टयांवर पोलिसांनी कारवाई केली. या परिसरातील दारू भट्टयांचा शोध घेऊन थेट पोकलेनद्वारे त्या नष्ट करण्यात आल्या.

या कारवाईत तब्बल एक हजार लिटर रसायन नष्ट करण्यात आलं. याशिवाय भट्टीसाठी वापरली जाणारी लाकडेही जाळून टाकण्यात आली.

Advertisement

ग्रामस्थांच्या तक्रारी

जेजुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भोसलेवाडी आणि राजवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध दारू भट्टया असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याबाबत ग्रामस्थांच्याही वारंवार तक्रारी आलेल्या होत्या.

त्या अनुषंगाने पोलिस निरीक्षक सुनील महाडीक यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने दारू भट्ट्या उद्ध्वस्त केल्या. शेतकऱ्यांच्या शेतात अवैधपणे टाकलेल्या दारु भट्ट्या थेट पोकलेनच्या सहाय्याने उद्‌ध्वस्त करण्यात आल्या.

 

Advertisement