राजगड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या रज्जाक महंमद मणेरी (वय-२८, मूळगाव बावडा, ता. इंदापूर, जि. पुणे) या शिपायाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.

रज्जाक यांचे नातलग गावाहून पूर्ण एक दिवस त्यांचा फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत होते. परंतु रज्जाक यांनी फोन उचलला नाही. त्यामुळे त्यांच्या नातेवाइकांना संशय आल्याने ते किकवी येथे आले.

यावेळी हा प्रकार उघडकीस आला. रज्जाक यांनी हाताची नस कापल्यानंतर गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे निदर्शनास आले. रज्जाक यांचे वडील पोलीस सेवेतून निवृत्त झाले असून, त्यांचा मोठा तौसिफ हा वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात सेवेत आहे.

Advertisement

आत्महत्या करण्यापूर्वी ब्लेडने नस कापून रक्ताने फरशीवर मॉम आय एम सॉरी असे लिहिल्याचे आढळून आले. रज्जाक हे अविवाहित असून, त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.