Punelive24.com
Latest News, Videos, Web Stories and Photos from Pune

मंत्र्यांच्या कारवरील पोलिस चालकाची आत्महत्या

नैराश्य, घरगुती वादातून आत्महत्या करण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यातच कामाचा अतिताण असला, तर मग विचारायलाच नको.

पोलिसांना कामाचा अतिरिक्त ताण, कामाचे ठराविक नसलेले तास, बंदोबस्तावर जेवण वेळेवर मिळेल, की नाही, याची नसलेली खात्री यामुळे पोलिसांत जादा नैराश्य असते.

त्यांच्यासाठी समुपदेशनाची व्यवस्था करूनही आत्महत्या थांबायला तयार नाहीत. अशीच घटना अलिबागमध्ये घडली.

पंख्याला लटकून गळफास

मंत्र्याच्या डिव्ही कारवर चालक म्हणून काम करणाऱ्या एका पोलिस नाईकाने आत्महत्या केली. प्रशांत ठाकूर (35) असे या पोलिस नाईकाचे नाव आहे.

अलिबागमधील शिवाजीनगर या परिसरात राहत्या घरात पंख्याला गळफास घेत त्यांनी आत्महत्या केली. प्रशांत यांनी घरगुती कारणामुळे आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

पत्नीही पोलिसात

प्रशांत ठाकूर हा अलिबाग पोलिस ठाण्यात पोलिस नाईक म्हणून काम करीत होता. प्रशांत याची नुकतीच एका मंत्र्यांच्या डिव्ही कारवर चालक म्हणून नेमणूक करण्यात आली होती. प्रशांत याची पत्नीही रायगड पोलिस दलात पोलिस अधीक्षक कार्यालयात काम करतात.

अशी उघडकीस आली घटना

गेल्या आठ दिवसांपासून प्रशांत यांची पत्नी माहेरी गेली होती. त्यामुळे तो हा घरी एकटाच राहत होता. काल सकाळी अकराच्या सुमारास संबंधित मंत्र्यांच्या दौरा होता. त्यामुळे डिव्ही कारची चावी देण्यासाठी एक पोलिस कर्मचारी प्रशांत यांच्या घरी गेला.

त्या वेळी त्याने बराच वेळ फ्लॅटचा दरवाजा ठोठावला; मात्र प्रशांतने काहीही दाद दिली नाही. यानंतर त्या पोलिस कर्मचाऱ्याने अलिबाग पोलिस ठाण्यात संपर्क साधला.

अलिबाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर त्यांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. यावेळी प्रशांत हा फ्लॅटमध्ये पंख्याला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन लटकलेल्या अवस्थेत दिसला.

आत्महत्येचं गूढ कायम

पोलिसांनी पंचनामा करून प्रशांतचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. प्रशांत याने नेमकी आत्महत्या का केली?

याबाबत अद्याप कारण समजलेले नाही; मात्र घरगुती कारणामुळे त्याने आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे.

Leave a comment