पुणे – करोना विषाणूच्या संसर्गामुळे मागील तीन वर्षांपासून महाराष्ट्रात पोलीस भरती (Police recruitment) प्रक्रिया राबवण्यात आली नाही. त्यामुळे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आता निराशा पाहायला मिळत आहे. असं असताना अलीकडेच सरकारने नोव्हेंबरपासून पोलीस भरती (Police recruitment) प्रक्रिया सुरू करणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, या घोषणेनंतर सरकारने लगेच यू-टर्न घेतला आहे. नोव्हेंबरमध्ये होणारी पोलीस भरती (Police recruitment) पुढे ढकलण्यात आली आहे. प्रशासकीय कारणास्तव ही भरती पुढे ढकलल्याचे सांगण्यात येत आहे.

मात्र, याला आता स्थगिती दिली असून नवीन वेळापत्रक पुढील आठवड्यात जाहीर केले जाईल, असे प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले आहे. राज्य सरकारने पोलिस भरती (Police recruitment) प्रक्रियेला स्थगिती दिली असली तरी ही तात्पुरती स्वरुपातील आहे.

स्थगिती देण्यात आलेल्या भरतीबाबतचा निर्णय पुढील आठवड्यात घेण्यात येणार आहे. असं देखील सांगण्यात आला आहे. तीन वर्षात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या जागांसाठी परती प्रक्रिया राबवण्यात येणार होती.

या तीन वर्षात वयोमर्यादा संपल्यामुळे अनेकजण पोलिस भरतीसाठी पात्र ठरत नाहीत. अशा तरुणांना संधी मिळावी, तसेच त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये.

यासाठी ही भरती प्रक्रिया स्थगित करून सुधारित अधिसूचना पुन्हा जारी करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात पोलिस भरतीची जाहिरात निघाल्यानंतर वयोमर्यादा शिथिल करण्यात येऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

पोलीस शिपाई पदांसाठीची ही भरती प्रक्रिया 14956 जागांसाठी आहे. पोलीस शिपाई पदासाठी प्रथम 50 गुणांची शारीरिक चाचणी परीक्षा घेतली जाईल आणि त्यानंतर 100 गुणांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.

शारीरीक चाचणी मध्ये किमान 50 टक्के गुण मिळविणारे उमेदवार 110 प्रमाणात 100 गुणांच्या लेखी परीक्षेसाठी पात्र असणार आहेत.

लेखी परीक्षेत सुध्दा किमान 40 टक्के गुण मिळविणे अनिवार्य केले आहे. अशा प्रकारे उमेदवारांची अंतिम निवड शारीरीक चाचणी व लेखी परीक्षा अशा एकूण 150 गुणांमधून केली जाणार आहे.

कुठे किती जागा आहेत?

मुंबई – 6740

ठाणे शहर – 521

पुणे शहर – 720

पिंपरी चिंचवड – 216

मिरा भाईंदर – 986

नागपूर शहर – 308

नवी मुंबई – 204

अमरावती शहर – 20

सोलापूर शहर- 98

लोहमार्ग मुंबई – 620

ठाणे ग्रामीण – 68

रायगड -272

पालघर – 211

सिंधूदुर्ग – 99

रत्नागिरी – 131

नाशिक ग्रामीण – 454

अहमदनगर – 129

धुळे – 42

कोल्हापूर – 24

पुणे ग्रामीण – 579

सातारा – 145

सोलापूर ग्रामीण – 26

औरंगाबाद ग्रामीण- 39

नांदेड – 155

परभणी – 75

हिंगोली – 21

नागपूर ग्रामीण – 132

भंडारा – 61

चंद्रपूर – 194

वर्धा – 90

गडचिरोली – 348

गोंदिया – 172

अमरावती ग्रामीण – 156

अकोला – 327

बुलढाणा – 51

यवतमाळ – 244

लोहमार्ग पुणे – 124

लोहमार्ग औरंगाबाद -154

एकूण – 14956

कोणत्या प्रवर्गाला किती जागा?

अनुसूचित जाती – 1811

अनुसूचित जमाती – 1350

विमुक्त जाती (अ) – 426

भटक्या जमाती (ब) – 374

nomadic tribes भटक्या जमाती (क) -473

भटक्या जमाती (ड) – 292

विमुक्त मागास प्रवर्ग – 292

इतर मागास वर्ग – 2926

इडब्लूएस – 1544

खुला – 5468

जागा एकूण – 14956