मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या एका कॉन्स्टेबलने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेमुळे भोपाळमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा पथकातील कर्मचाऱ्याने अशी अचानकपणे हत्या केल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. या सुरक्षा कर्मचाऱ्याचं नाव अजय सिंह आहे.

सहा महिन्यांपासून सुरक्षा व्यवस्थेत

अजय सिंह हे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या सुरक्षा पथकात गेल्या सहा महिन्यांपूर्वी तैनात होते. अजय हे बुधवारी (30 जून) नेहमीप्रमाणे सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेसाठी ड्युटीवर तैनात होणार होते.

Advertisement

ते ड्यूटीवर नेहमी वेळेवर हजर राहायचे; मात्र बुधवारी सकाळी बराच काळ उलटून गेला तरी ते आले नव्हते. त्यामुळे सुरक्षा ऑफिसमधून अजय यांना फोन करण्यात आला. मात्र, अजय फोन उचलत नव्हते.

नातेवाइक घरी गेल्यावर आत्महत्येची माहिती उघड

ऑफिसमधून अजय यांच्या नातेवाइकांना फोन लावण्यात आला. त्या नातेवाइकांनी भोपाळमध्ये राहत असलेल्या नातेवाइकांना फोन करुन अजयच्या घरी जावून चौकशी करण्यास सांगितलं.

त्यानुसार अजय यांचे भोपाळमधील एक नातेवाइक त्यांच्या घरी पोहोचले. तिथे पोहोचल्यावर घराचा दरवाजा आतमधून लॉक आहे, हे अजय यांच्या नातेवाइकाच्या लक्षात आलं.

Advertisement

त्यांनी घराच्या मागच्या बाजूने घरात ढुंकून पाहिलं तर त्यांच्या पायाखालची जमीनच घसरली. कारण त्यांच्यासमोर अजय यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला.

 

Advertisement